Beed Rain News : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड (Beed) जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं गावांमध्ये पाणीच पाणी झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहतू असून, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तसेच शेता पाणी शिरल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.  


उडीद , मूग, कांदा या पिकाचे मोठं नुकसान


सध्या बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. आष्टी तालुक्यातील काही सराटे वडगाव, आनंदवाडी या दोन गावांना पावसानं चांगलच झोडपलं आहे. या भागातील शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या सराटे वडगाव, आनंदवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. या ढगफुटीमुळं शेतील उडीद , मूग, कांदा या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शासनानं त्वरीत पंचनामे करावेत अशी मागणी, सराटे वडगावचे सरपंच राम बोडखे यांनी केली आहे. तसेच शेतात जाणारे दोन पूर तयार केले होते. ते पूल देखील या ढगफुटीत  वाहून गेले आहेत. त्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं शासनानं त्वरीत मदत करावी अशी मागणी सरपंच राम बोडखे यांनी केली आहे.




पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातच्या कच्च भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, राज्यात अद्यापही तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: