Agricultural compensation: मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होत होती. दरम्यान सरकराने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तर उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. 

कोणत्या जिल्ह्याला किती नुकसानभरपाई.... 

जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 


औरंगाबाद जिल्ह्याला वगळले...

मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र याचवेळी औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.