बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याबाबतची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) बीडमधील (Beed) इशारा सभेतून करणार आहे. 23 डिसेंबरला बीडमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मनोज जरांगेंच्या बीडमधील सभेपूर्वी पोलिसांकडून 400 उपद्रवी लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच, यापैकी आतापर्यंत 375 जणांवर प्रतिबंध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे, याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून जरांगेंच्या सभेपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. 


बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणारा असून, आतापर्यंत 375 जणांवर प्रतिबंध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार असून, या सभेची बीडमध्ये जयंत तयारी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे सभेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीडमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील आणि एसआरपीएफच्या देखील तुकड्या बंदोबस्तासाठी मागवण्यात येणार आहे. तसेच, सभेदरम्यान आणि सभेनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 400 उपद्रवी लोकांची लिस्ट पोलिसांनी तयार केली आहे. यापैकी 375 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.


पोलिसांकडून उपद्रवी लोकांवर लक्ष 


काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरामध्ये सभा होत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. तसेच, या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उपद्रवी लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. 


सभेकडे राज्याचं लक्ष... 


मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लागल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 23 डिसेंबरला बीड शहरात इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या सभेची जोरदार तयारी मराठा आंदोलकांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 50 एकरवर ही सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या इशारा सभेतून मनोज जरांगे कोणती भूमिका मांडणार आणि सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास पुढचे आंदोलन कसे असणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरून जरांगे नाराज; काही अधिकारी जाणून बुजून नोंदी शोधत नसल्याचा आरोप