Beed News : एकीकडे एचआयव्ही बाधितांसाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना, दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एचआयव्ही बाधित मुलं शाळेत शिकत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर एचआयव्ही बाधित मुलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शाळा भरवली. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे. 


बीडपासून काही अंतरावर असलेल्या इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ केला जातो. दरम्यान या ठिकाणी राहणारी मुलं ही पाली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र गावातील काही नागरिकांचा या मुलांना शाळेत येण्यासाठी विरोध होता. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत एचआयव्ही बाधित मुलं शिकत असल्याने ग्रामस्थांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकल आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संस्थाचालकाने या मुलांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शाळा भरवली होती. दरम्यान याची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली. 


कारवाई करण्याची मागणी...


इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत येण्यास विरोध केल्याने संस्थाचालक मुलांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शाळा भरवली. एकीकडे सरकारकडून एड्स संदर्भामध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये या मुलांना शाळेत येण्यापासून ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी रोखल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी इंडियाच्या संस्थाचालकांनी केली आहे. 


गावकऱ्यांनी थेट ठोकले शाळेला कुलूप...


पाली गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यामुळे गावातील मुलं याच शाळेत शिक्षण घेतात. दरम्यान आजूबाजूला असलेल्या वस्तीवरील देखील विध्यार्थी याच शाळेत शिक्षणासाठी येत्तात. दरम्यान याच परिसरात असलेल्या इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये राहणारे एचआयव्ही बाधित मुलं देखील याच शाळेत येत असतात. मात्र त्यांना काही गावकऱ्यांचा विरोध होता. तर काही शिक्षकांचा देखील विरोध असल्याचा आरोप आहे. दरम्यान विरोध करूनही एचआयव्ही बाधित मुलं शाळेत येत असल्याने गावकऱ्यांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकले आहे. त्यामुळे या एचआयव्ही बाधित मुलांच्या शिक्षणाचं प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन यावर मार्ग काढावा. तसेच हे मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Teacher Accident : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 'गुरुजीं'चा अपघात; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू