Beed Teacher Accident : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात (Accident) होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघाताची घटना ताजी असतानाच आता बीड (Beed) जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. मोटारसायकल आणि कारच्या भीषण अपघात झाला असून, यात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी अपघातग्रस्त दुचाकी वाहनाने पेट घेतल्याने ती जागीच जळून खाक झाली. शहादेव शिवाजी डोंगर (वय 50, रा. जाट नांदूर) आणि अंकुश साहेबराव गव्हाणे (वय 48) अशी मयत प्राध्यापकांची नावं आहेत.
बीडच्या शिरूरजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहादेव डोंगरे आणि अंकुश गव्हाणे अशी या प्राध्यापकांची नाव आहेत. हे दोन्ही शिक्षक शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होते. दरम्यान आज सकाळी नेहमीप्रमाणे ते बीडवरून शिरूर येथे महाविद्यालयाकडे निघाले होते. तर मुर्शदपुर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारणे पाठीमागून जोराची धडक दिली, आणि यामध्ये या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दुचाकी जळाल्याने दोन्ही प्राध्यापकांचे मृतेदहही होरपळले
महाविद्यालयाकडे निघालेल्या शहादेव डोंगरे आणि अंकुश गव्हाणे या शिक्षकांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. मात्र अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला आणि दुचाकी जळून खाक झाली. तर दुचाकी जळाल्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही प्राध्यापकांचे मृतेदही होरपळले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही प्राध्यापकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना समोर आल्याने बीड शहरासह शिरूरच्या कालीकादेवी महाविद्यालयात शोककळा पसरली.
महाविद्यालयात शोककळा...
अपघातात मृत्यू झालेले दोन्ही शिक्षक शिरूरच्या कालीकादेवी महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करत होते. तर महाविद्यालयात जात असतानाच त्यांचा अपघात झाला आणि त्यात मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती महाविद्यालयात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. तर अपघाताची माहिती कळताच महाविद्यालयातील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तर दोन्ही शिक्षकांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची देखील रुग्णालयात गर्दी पाहायला मिळाली. तर या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
समृद्धी महामार्गाला अपघातांचा विळखा? पुन्हा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर