Beed Suicide Case: काकासोबत होत असलेल्या शेतीच्या वादातून एका वीस वर्षीय तरुणाने स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवून, गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या (Beed) नेकनूर तालुक्यातील अंधापुरी गावात ही घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.  शुभम बाळासाहेब जगताप (वय 20 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, शेतीच्या वादाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे.


अधिक माहिती अशी की, शुभम जगताप हा पहाटे पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडला. त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवर त्याने भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास गावातील काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून शुभम आणि त्याच्या काकाम्ध्ये शेतीच्या वादातून भांडण सुरू होते. त्यामुळे या वादाला आणि काकाच्या त्रासाला कंटाळून शुभमने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे मामा शिवाजी घरत त्यांनी केला आहे.


दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. तर शुभमच्या कुटुंबियांनी त्याच्या चुलत्याच्या वादाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा देखील तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे. मात्र शुभमने टोकाचं पाऊल उचलल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 


स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेट्स ठेवलं...


शुभम आणि त्याच्या काकामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीवरून वाद सुरु होते. त्यामुळे शुभम गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचा दावा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. दरम्यान रविवारी पहाटे पाचच्या सुमारास शुभम घरातून बाहेर पडला. तसेच त्याने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेट्स ठेवला. सकाळी जेव्हा त्याच्या काही मित्रांनी हे स्टेट्स दिसले त्यांना धक्काच बसला. त्यामुळे याची माहिती त्यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देऊन शुभमचं शोध सुरु केला. मात्र शुभम शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावात शोकाकुळ वातावरण होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalgaon Suicide : 'मरावे असे काही कारण पण नाही, पण..' जळगावमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा टोकाचा निर्णय