Jalgaon Suicide : 'एकटे एकटे वाटते, मरावे का? याचं कारण काय मलाच माहीत नाही, पण जगून काहीच फायदा नाही' अशी दोन पानी सुसाईड नोट लिहीत जळगावातील एका दहावीच्या विद्यार्थिनीने टोकाचा (girl Suicide) निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णाप्रिया अरुण पाटील (Krushnapriya Patil) असे मृत मुलीचे नाव असून ही घटना जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर पोलीस हद्दीतील शास्त्रीनगरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात घडली आहे.
धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील सतखेडा येथील अरुण पाटील हे पत्नी व दोन मुलांसह जळगावातील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास आहे. शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची मुलगी कृष्णप्रिया ही शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात (10th STD) शिक्षण घेत होती. अरुण पाटील हे पत्नी व मुलाला घेवून शिरपुर येथे कामानिमित्ता गेले होते. त्यावेळी घरात कृष्णप्रिया ही मुलगी एकटीच होती. बुधवारी सकाळपासून कृष्णप्रिया घराबाहेर न आल्यामुळे घर मालकाने सायंकाळी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता, त्यांना कृष्णप्रिया ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी तिने भिंतीवर "रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ" असे लिहिले. शिवाय दोन पानी सुसाईड नोट लिहून आई पप्पा मी तुमची इच्छा पूर्ण करु शकणार नाही, मी जीवनाला कंटाळली असून माझ्या विचारांच्या दबावामध्ये असून मला माफ करा, असे म्हणत तिने जीवनयात्रा संपविली. दोन पानी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असे देखील म्हटले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करुन विद्यार्थीनीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय लिहिलयं चिठ्ठीत?
'वेळ सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटे, मी मरेल! कारण? मला माहित नाही, एकटे एकटे वाटतं! म्हणजे असं की जगून काहीच फायदा नाही, पण मी मरेल, मला माफ करा! मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्या आधीच मरेल, पण काय करू? माझ्या विचारांचा पूर्णपणे घोळ झाला आहे. प्रत्येक क्षणाला दोन दोन विचार येतात, जगातील सर्व दुश्मन आहेत, 'मी कालच मरणार होते, पण हिंमत झाली नाही, आज हिम्मत करेल आणि मरेल', मरावे असे काही कारण पण नाही, पण जगून काय मिळेल? सॉरी! पण तुमचे नाव बदनाम होणार नाही. आपल्या घरचे नाव बदनाम होण्याचे कारण नाही, आप्पाची स्टेटमेंट राहून जाईल, असा मजकूर चिठ्ठीत आढळून आला आहे.