बीड: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. बीडमध्ये घडणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती गुन्ह्यांच्या घटना आणि हत्या या अद्यापही सुरूच असल्याचं चित्र आहे. अशातच एका तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले आहे. बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून शिवाजीनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. विजय काळे असे मृत तरुणाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने विजयच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार करून खून केल्याच समोर आलं आहे. या हत्येचं कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस याचा अधिक तपास करत आहे. मात्र तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा एकदा हादरले आहे.

Continues below advertisement


चिमुलकीवर अत्याचार; आज परळी बंदची हाक


बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी आई-वडिलांसोबत आलेल्या सहा वर्षाच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत त्याला पाच तासातच अटक केली. आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.नागरिकांकडून सकाळी 9.30 वा. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक ते रेल्वे स्थानक परिसरात मूक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.आजच्या परळी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी या आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.


नाशिकमध्ये भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून खून


अल्पवयीन मुलाने एका भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून त्र्यंबक नाका परिसरात एका विधी संघर्षित बालकाने एका भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून भर दिवसा खून करत मृतदेहा जवळच हातवारे करत नाचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधीसंघर्षित मुलगा मैत्रिणी सोबत ठक्कर बजार जवळील एका हॉटेल जवळ उभा होता. त्यावेळी त्याची मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता. त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधीसंघर्षित मुलाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला या घटनेत अज्ञात भिक्षेकरीचा मृत्यू झालाआहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला, यातील संशयित अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर मृत्यूदेहची ओळख पटविण्याचे काम सुरू असून सरकारवाडा पोलिस पुढील तपास करत आहेत.