बीड : लिंग बदलाची ( Sex Change Surgery) शस्त्रक्रिया करुन पुरुषाचं आयुष्य जगणाऱ्या बीडच्या (Beed News) ललित साळवेच्या सुखी संसारात तब्बल पाच वर्षानंतर सुखी गोड चिमुकल्याची एन्ट्री झाली आहे. ललितच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. चिमुकल्याचं आगमन कपूर झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. साळवे दाम्पत्याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे.
बीडच्या पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असलेले ललित साळवे यांच्या संघर्षाची कहाणी अवघ्या महाराष्ट्राला माहीतच आहे. ललित साळवे ज्या कुटुंबात जन्मले तेव्हा ते एक मुलगी म्हणूनच वाढले होते. अगदी बालवाडीपासून तर बारावीपर्यंत ललिता म्हणूनच त्यांनी शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण घेतलं. मात्र आपण एक स्त्री नसून पुरुष असल्याचे जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हा त्यांनी लिंग बदलण्यात निर्णय घेतला. या निर्णयाला सुरुवातीला कुटुंबीयांनी विरोध केला. मात्र त्यांच्यामध्ये असलेला पुरुष त्यांना शांत बसू देत नव्हता आणि त्यांनी शेवटी तीन वेळा सर्जरी करून आपण पुरुष असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर ललिताचा ललित झालेल्या ललितने एका मुलीसोबत लग्न केलं. तब्बल पाच वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे..
मकर संक्रांतीच्या दिवशी चिमुकल्याचे आगमन
लहानपणीपासूनच ललिता म्हणून राहिलेल्या ललितने समाजातील अनेक रूढ असलेल्या परंपरेचा सामना केला आणि संघर्ष देखील केला. मात्र मनामध्ये जिद्द होती की, आपण स्त्री नसून पुरुष आहोत . अनेकदा हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते. अखेर जेव्हा त्यांची सर्जरी झाली तेव्हा अनेकांना त्यांच्यावर विश्वास बसला. मात्र ललित सोबत लग्न कोण करणार हा प्रश्न सर्वांसमोर होता. अशातच एका मुलीने ललितवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत विवाह केला. पाच वर्षे त्यांचा संसार सुखात सुरू असतानाच ललित आणि सीमाला मकर संक्रांतीच्या दिवशीच एक गोड मुलगा झाला.
आता ट्रान्समॅन असलेल्या ललित साळवेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून अनेक जण संपर्क साधत आहेत. मुलगा असून देखील मुलीचा आयुष्य कसा जगला आणि सर्जरी करून स्वतः पुरुष आहोत हे कसं समाजाला दाखवून दिले यासाठी त्यांची अनेकांना मदत होत आहे.
हे ही वाचा :
Gauri Sawant : तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं मन हेलावून टाकणारं वास्तव