Beed News: बीड : बीडच्या (Beed News) अंबाजोगाई तालुक्यात (Ambajogai Taluka) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ (Bardapur) लातूर (Latur) अंबाजोगाई रोडवर (Ambajogai Road) एक कार जळून खाक झाली आहे. अचानक आग लागल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेच चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. 


अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. कारमध्ये होरपळलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख अजूनही पटलेली नाही. ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंतच्या पोलीस तपासात ही कार लातूर येथील एका व्यक्तीची असल्याचं समोर आलं आहे. 


दुर्घटनाग्रस्त कार काल (20 डिसेंबर) रोजी संध्याकाळच्या वेळी अंबाजोगाईहून लातूरकडे जात होती. एका पेट्रोल पंपावर ही कार येऊन थांबली. बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ कार येताच या कारनं अचानक पेट घेतला. अचानक आग लागली, काही क्षणांत कार जळून खाक झाली. यामध्ये कारमधील एका व्यक्तीचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बर्दापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी कारमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख देखील पटली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


कार लातूर येथील व्यक्तीची 


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर-अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे.  विशेष म्हणजे, या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसून, मयत स्त्री आहे की पुरुष याचा देखील खुलासा होऊ शकला नाही. ही कार लातूर येथील व्यक्तीची असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. 


काही क्षणांत कार जळून खाक


बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कार अंबाजोगाईहून लातूरकडे निघाली होती.  दरम्यान, बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ येताच कारला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात कार अक्षरशः पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीत चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक व्यक्ती जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसून आला. या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास केला जात आहे. 


अपघात की घातपात...


बीड जिल्ह्यातील बर्दापूरजवळ कार जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याच घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारमधील चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवरील व्यक्तीचा जळून मृत्यू झाला आहे. मात्र, याचवेळी कारचालक किंवा कारमालक कोणीही घटनास्थळी आढळून आले नाही. त्यामुळे हा अपघात आहे की, घातपात यादृष्टीने देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी संबंधित कारची माहिती काढली असून, कारमालक सापडल्यानंतरच या सर्व गोष्टींचा खुलासा होऊ शकणार आहे.