बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात झाला आहे. रात्री बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. यामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडेसह अन्य दोन जण असे चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, एका जखमीवर उपचार सुरु आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते. 


अधिक माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. रात्री 12 वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे (वय 35 वर्षे, रा.धामणगाव), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे (दोन्ही राहणार जाटदेवळा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. 


पोलिसांची घटनास्थळी धाव... 


आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात असतानाच, पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने जोरदार धडक दिली. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 


चालकाचा जागीच मृत्यू... 


रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे एका रुग्णाला घेऊन जात होते. दरम्यान, ज्यात एकूण पाच जण होते. रुग्णाला लवकर रुग्णालयात पोहचवण्यासाठी लोखंडे यांचा प्रयत्न होता. मात्र, आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक धामणगावकडून अहमदनगरकडे जात असतानाच रुग्णवाहिका या ट्रकवर जाऊन धडकली. थेट समोरचा भाग ट्रकवर जाऊन धडकल्याने चालक लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. 


आणखी एका अपघतात चौघांचा मृत्यू..


दौलावडगाव शिवारात रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना समोर आली असतानाच, आणखी एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बीडच्या जामखेड-अहमदनगर मार्गावरील आष्टा  फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे सकाळी 6 वाजता हा अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये देखील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 25 प्रवासी जखमी झाले असून, नऊ जण गंभीर आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांची घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीडमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू, 25 जण जखमी