बीड : जामखेड-अहमदनगर मार्गावरील आष्टा फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर येत आहे. आज पहाटे सकाळी 6 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 25 प्रवासी जखमी झाले असून, नऊ जण गंभीर आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांची घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. 


जामखेड-अहमदनगर मार्गावरील आष्टी फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जामखेड व आष्टी येथील शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति गंभीर जखमींना अहमदनगर येथे रवाना करण्यात आले आहेत. सागर ट्रॅव्हल्सची ही बस होती. आष्टा फाट्याजवळ येताच या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.पहाटेच्या वेळी प्रवासी झोपेत असताना अचानक ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने मोठा अपघात झालेला आहे. ट्रॅव्हलच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. 


प्रवासी झोपेत असताना अचानक ट्रॅव्हल्स पलटी


सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडून बीडकडे जात होती. यात अंदाजे 30 प्रवासी असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, रात्रीचा प्रवास करत ही ट्रॅव्हल बस पहाटे बीड जिल्ह्यात पोहचली होती. प्रवासी यावेळी झोपेत होते. दरम्यान, अचानक सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, 5 जणांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे यात 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. 


स्थानिक मदतीला आले धावून...


सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडून बीडकडे जात असतानाच या बसचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. मात्र, स्थानिकांनी मोठी कसरत करून सर्वच जखमींना बसमधून बाहेर काढत त्यांना रुग्णालयात पाठवले. विशेष म्हणजे अपघाताची माहिती मिळताच, आमदार सुरेश धस यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Accident : रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचं भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, जखमीवर उपचार सुरु