Babanrao Taywade on Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबई धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. तर या आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. गोवा येथे नुकतेच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

Continues below advertisement


मात्र, मनोज जरांगे हे मानसिक तणावातून आरोप करत आहे. कदाचित मनोज जरांगे हेच असले कृत्य करत असावे, त्यामुळे त्यांनी ही भावना व्यक्त केली असावी. खरंतर मनोज जरांगे हेच महाराष्ट्रात मराठा व मराठेत्तर वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांनी केलेले सर्व आरोप फ़ेटाळून लावले आहे. ते नागपूर येथे बोलत होते.


....मात्र कोणत्याही समाजाचे नेतृत्व संपावे, ही आमची भावना नाही- बबनराव तायवाडे


गोवा येथे नुकतेच झालेलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेश हे बंद दाराआड झालेलं नाही, खुल्या व्यासपीठावर झाले आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते त्यात सहभागी झाले होते व ऑनलाईन पद्धतीने सर्वांना अधिवेशन बघता येत होते. त्यामुळे कट रचण्याचा प्रश्न नाही. ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले, त्यामुळे ओबीसींना सरकारमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळले. त्यामुळे ओबीसी पालकमंत्री अधिक आहे. मात्र कोणत्या समाजाचे नेतृत्व संपावे, ही आमची भावना नसल्याचेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. तसेच मी मनोज जरांगे यांच्या सोबत खुल्या व्यासपीठावर कुठेही चर्चा करायला तयार आहे. असेवाहन देखील त्यांनी दिलं आहे.


मनोज जरांगे पाटील यांचे आरोप काय?


मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. लोकांना बेजार करुन टाकलंय. सरकार गोरगरीब जनतेला, मराठ्यांना, अठरापगड जातीच्या लोकांना संधी देत नाही, दलित मुस्लीमांनाही न्याय द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीसांनी नवीनच सुरु केलंय, मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी कोण लढणार, ही पद्धत चांगली नाही. हे फक्त भांडणं लावायचं कायम करतातय. मराठ्याच्या विरोधात दंगल करा, असं ओबीसींच्या नेत्यांचे कान भरले आहे. दंगल झाली ना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला तुम्ही जबाबदार असाल, आता मोकळीक नाही. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.


हे हि वाचा