Shani Sade Sati and Dhaiya : वैदिक शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीची (Shani Dev) साडेसाती आणि ढैय्या जेव्हा लागते तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. सध्या मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. तर, सिंह, धनु रासीवर शनीची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षांपर्यंत या राशीच्या (Zodiac Signs) लोकांवर शनीची ढैय्या आणि साडेसाती असणार आहे. त्यामुळे या राशींना येणाऱ्या काळात सावधानतेची गरज आहे.

शनी जेव्हा राशी परिवर्तन करतील तेव्हा कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून आणि सिंह, धनु राशीच्या लोकांना ढैय्यापासून मुक्ती मिळेल. तर, मीन आणि मेष राशीवर शनीचा अशुभ प्रभावच राहील. माहितीसाठी शनीची साडेसाती साडे सात वर्ष तर ढैय्याचा कालावधी अडीच वर्षांचा असतो. 

कधी लागते शनीची साडेसाती आणि ढैय्या? 

ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा ना एकदा शनीच्या साडेसातीचा आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनी जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा तीन राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती राहते. तर, दोन राशींवर शनीची ढैय्या सुरु होते. शनी ज्या राशीत राशी परिवर्तन करतायत त्या राशीवर आणि त्याच्या एक रास पुढे आणि मागे शनीची साडेसाती सुरु होते. तर, शनीच्या राशी परिवर्तनाच्या वेळी ज्या राशीच्या चौथ्या किंवा आठव्या चरणात असतात तेव्हा त्या राशीवर शनीची ढैय्या सुरु होते. अशा वेळी या राशींच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. 

पुढचे अडीच वर्ष या राशींना सावधानतेचा इशारा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पुढच्या वर्षांपर्यंत मेष, कुंभ, मीन, सिंह आणि धनु राशींच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हा काळ या राशींसाठी फार आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे या काळात कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. तसेच, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. पैशांची गुंतवणूक करु नका. यांसारख्या अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा शनीच्या ढैय्या आणि साडेसातीचा प्रभाव अधिक तीव्र होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Angarki Chaturthi 2025 : अंगारकी चतुर्थीचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार? वाचा चतुर्थीचे उपाय आणि फायदे