एक्स्प्लोर

'विप्रो'चे अझीम प्रेमजी ठरले सर्वात दानशूर भारतीय! रोज सरासरी 22 कोटी दान

ह्युरन इंडिया (EdelGive Hurun India Philanthropy List 2020) ने भारतातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींची यादी प्रसारित केली आहे. त्यात अझीम प्रेमजी हे मानवतावादी कार्य करणाऱ्यांसाठी आदर्श असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली: दिग्गज आयटी कंपनी अशी ख्याती असणाऱ्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे 2020 सालचे सर्वात दानशूर भारतीय ठरले आहेत. त्यांनी या एका वर्षात आपल्या संपत्तीपैकी 7,904 कोटी रुपयांचे दान केले. याचा जर हिशोब केला तर त्यांनी प्रतिदिन सरासरी 22 कोटी रुपयांचे दान केल्याचे लक्षात येते. भारतातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी ह्युरन इंडिया (EdelGive Hurun India Philanthropy List 2020) ने तयार केली आहे. त्यात अझीम प्रेमजी प्रथम क्रमांकावर आहेत.

भारतात कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1 एप्रिल रोजी अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविराधातील लढाईसाठी 1,125 कोटी रुपयांचे योगदान दिले होते. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक CSR फंडाच्या आणि त्यांच्या इतर मानवतावादी कार्याच्या व्यतिरिक्त होती. ह्युरन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद यांनी सांगितले की, "अजिम प्रेमजी हे भारतीय मानवतावादी कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहेत. तसेच त्यांनी अनेक नवउद्योजकांना अशा प्रकारचे मानवतावादी कार्य करण्यास सातत्याने प्रेरणा दिली आहे."

HCL टेक्नॉलॉजीचे शिव नादर हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांनी सामाजिक कामांसाठी 795 कोटी रुपये दान केले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडियाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 458 कोटी रुपये दान केले आहेत. रिलायन्सने 30 मार्च रोजी PM CARES फंडासाठी 500 कोटी रुपयांची मदत केली होती. तसेच गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

276 कोटी रुपये सामाजिक कामांसाठी खर्च करुन कुमार मंगलम बिर्लानी या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. पाचव्या स्थानी वेदांत समुहाचे संस्थापक अनिल अगरवाल हे आहेत. त्यांनी 215 कोटी रुपयांचे दान केले आहे. त्यांनी 2014 साली त्यांच्या संपत्तीपैकी 75 टक्के संपत्ती ही दान केली होती असे हा अहवाल सांगतोय.

ह्युरन इंडिया आणि EdelGive ने बुधवारी EdelGive Hurun India Philanthropy List 2020 ही यादी सादर केली. या यादीत भारतीय उद्योगपतींनी 2020 या सालात सामाजिक कामासाठी केलेल्या दानधर्माची माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget