Year Ender 2023 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाकडे (Year Ender 2023) पाहताना कार (Auto News) प्रेमींसाठी 2023 हे वर्ष अनेक अर्थांनी खूप खास राहिलं आहे. कारण या वर्षी अनेक लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट केलेले मॉडेल लॉन्च करण्यात आलं. Tata Motors, Kia Motors, MG Motor, Honda, BMW आणि Mercedes सारख्या कंपन्यांनी आपल्या कार फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सादर केल्या. नवीन कार लाँच झालेल्या लिस्टमध्ये, टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि किया सेल्टोस फेसलिफ्ट तसेच एमजी हेक्टर फेसलिफ्ट या प्रमुख कारचा समावेश आहे. या कारमध्ये टॉप 10 फेसलिफ्ट कार नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


Tata Nexon आणि Nexon EV फेसलिफ्ट


यावर्षी, Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत सर्वात लोकप्रिय SUV Nexon आणि इलेक्ट्रिक SUV Nexon EV चे फेसलिफ्ट केलेले मॉडेल सादर केले आहेत, जे अनेक विशेष वैशिष्ट्यांसह उत्तम डिझाईन आणि नवीन लूक देतात. आता नेक्सॉन हे सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात प्रगत वाहन मानले जाते. Nexon फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाखांपर्यंत जाते. तर, Nexon EV फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 14.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.94 लाख रुपयांपर्यंत जाते.


टाटा हॅरियर फेसलिफ्ट


Tata Motors ने या वर्षी आपल्या पॉवरफुल मिडसाईज SUV Harrier चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे, जे लूक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत खूपच आकर्षक आहे. हॅरियर फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.44 लाख रुपयांपर्यंत जाते.


टाटा सफारी फेसलिफ्ट


टाटा मोटर्सची 7 सीटर SUV सफारी देखील यावर्षी फेसलिफ्ट मॉडेलमध्ये आली आहे. सफारी फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख ते 27.34 लाख रुपये आहे.


kia Sonet फेसलिफ्ट


Kia Motors ने या महिन्यात आपली सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV Sonet फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सादर केली आहे. त्याची किंमत पुढील महिन्यात जाहीर केली जाईल. नवीन सोनेट फेसलिफ्ट अनेक सेगमेंट फर्स्ट वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. 


kia seltos फेसलिफ्ट


Kia Motors ची सर्वाधिक विक्री होणारी SUV Seltos यावर्षी फेसलिफ्ट अवतारात आली आणि ती आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक बदलांसह लॉन्च करण्यात आली. नवीन सेल्टोस फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 10.90 लाख ते 20.30 लाख रुपये आहे.


होंडा सिटी फेसलिफ्ट


Honda City चे फेसलिफ्ट मॉडेल यावर्षी लॉन्च करण्यात आले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 11.63 लाख ते रु. 16.11 लाख आहे. सिटी फेसलिफ्ट उत्तम लूक-फीचर्स आणि मायलेजसह आली आहे.


MG हेक्टर फेसलिफ्ट


MG मोटर इंडियाने या वर्षी आपल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही हेक्टर आणि हेक्टर प्लसचे फेसलिफ्ट केलेले मॉडेल सादर केले आहेत, जे पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा खूपच वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. हेक्टर फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 15 लाख ते 22 लाख रुपये आहे आणि हेक्टर प्लस फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 17.80 लाख ते 22.73 लाख रुपये आहे.


BMW X7 फेसलिफ्ट


या वर्षी, BMW X7 चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आले आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1.24 कोटी ते 1.29 कोटी रुपये आहे.


मर्सिडीज बेंझ gle फेसलिफ्ट


अलीकडेच, मर्सिडीज-बेंझने आपल्या आलिशान SUV GLE चे फेसलिफ्ट केलेले मॉडेल लॉन्च केले, ज्याची एक्स-शोरूम किंमत 96.40 लाख रू. ते रु. 1.10 कोटी आहे.


ऑडी Q8 ई-ट्रॉन


ऑडी क्यू8 ई-ट्रॉन हे ऑडी ई-ट्रॉनचे फेसलिफ्ट केलेले मॉडेल आहे. या कारला मोठा बॅटरी पॅक मिळतो, त्यामुळे रेंजच्या दृष्टीने ही कार चांगली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 1.14 कोटी ते 1.26 कोटी रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Cars Price Hike in 2024 : जानेवारी 2024 पासून 'या' कंपन्यांच्या गाड्या महागणार; मारुती सुझुकीपासून BMW पर्यंत 'या' गाड्यांचा यादीत समावेश


Car loan Information:

Calculate Car Loan EMI