Cars Discontinued In 2022: वाहन उद्योगाच्या दृष्टीने 2022 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे होते. यादरम्यान देशात अनेक नवीन गाड्या लॉन्च झाल्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. मात्र यावर्षी अनेक गाड्यांचे उत्पादन कायमचे बंद देखील झाले आहे. या वर्षी कोणत्या गाड्या बंद झाल्या आहेत ते पाहूया.


फोक्सवॅगन पोलो


फोक्सवॅगन पोलोने ऑटो एक्सपो 2010 मध्ये भारतात पदार्पण केले. कंपनीने या प्रीमियम हॅचबॅक पोलोच्या 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची भारतात विक्री केली आहे. मात्र आता याचं उत्पादन आता बंद करण्यात आले आहे. असं असलं तरी सेवा आणि सुटे भाग पुढील 10 वर्षांसाठी सर्व पोलो मालकांना उपलब्ध असतील.


टोयोटा अर्बन क्रूझर


टोयोटाने आपली अर्बन क्रूझर एसयूव्ही बंद केली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या जुन्या विटारा ब्रेझाची रिबॅज केलेलं व्हर्जन होती. ही कार 6 ट्रिममध्ये बाजारात उपलब्ध होती.


महिंद्रा अल्तुरास जी 4  


महिंद्राने भारतीय बाजारपेठेसाठी आपली  SUV Alturas G4 चे उत्पादन बंद केले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवरून वाहन डी-लिस्ट केले आहे आणि एसयूव्हीसाठी बुकिंग होल्डवर ठेवले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात महागडी कार होती.


ह्युंदाई एलांट्रा


Elantra ही Hyundai ची प्रीमियम सेडान होती. कंपनीने याचे उत्पादन बंद केले आहे. यात 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे, त्याची प्रारंभिक किंमत 15.9 लाख रुपये होती.


Datsun GO, GO Plus आणि redi GO


निसान इंडियाने या वर्षी एप्रिलमध्ये आपला डॅटसन ब्रँड बंद केला आणि त्यासोबत, GO, GO+ आणि RediGO मॉडेल्सही बाजारातून बंद करण्यात आले.


फोक्सवॅगन व्हेंटो


पोलो हॅचबॅकसोबतच फोक्सवॅगनने व्हेंटो सेडानही बंद केली. याची रिप्लेसमेंट म्हणून कंपनीने भारतीय बाजारपेठेत Virtus लॉन्च केली आहे. जी मोठी आणि अधिक प्रीमियम आहे.


मारुती सुझुकी एस-क्रॉस


मारुती सुझुकीने अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून S-Cross SUV काढून टाकली आहे. मारुतीच्या प्रीमियम नेक्सा फ्रँचायझीद्वारे विकली जाणारी पहिली कार म्हणून एस-क्रॉस 2015 मध्ये भारतीय बाजारपेठेत आणली होती.


Hyundai Grand i10 NIOS आणि Hyundai Aura डिझेल


BS6 नियमांच्या अंमलबजावणीसह Hyundai ने त्यांच्या Grand i10 Nios आणि Hyundai Aura डिझेलची विक्री देखील बंद केली आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर डिझेल इंजिन आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI