Vehicles Sales in Navratri: गेल्या दोन वर्षांत वाहन बाजारात मंदी सदृश्य परिस्थिती होती. मात्र यंदाच्या नवरात्रीत वाहन निर्मात्यांची खऱ्या अर्थनाने चांदी झाली आहे. कारण नवरात्रीच्या उत्सवात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जबरदस्त विक्री झाली आहे. ज्यामध्ये नवरात्री 2021 च्या तुलनेत यावर्षी 57% पर्यंत अधिक विक्री झाली आहे. या कालावधीत सर्व सेगमेंटच्या वाहन विक्रीत मोठी वाढ झाली असून, दुचाकी चाकी, तीन चाकी, व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहने यांच्या विक्रीत अनुक्रमे 52%, 115%, 48%, 70% आणि 58% वाढ झाली आहे. 


किती झाली विक्री? 


नवरात्री 2019 च्या तुलनेत (कोविडपूर्वी) एकूण किरकोळ विक्री 16% नी वाढली आहे. तर व्यावसायिक वाहने आणि 3 चाकी वाहनांसह दुचाकी वाहनांची विक्री वाढली आहे. मात्र सर्वाधिक वाढ प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये दिसून आली आहे. नवरात्रीमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 1,10,521 होती तर 2021 च्या नवरात्रीत 64,850 विक्री झाली होती.


यावरून हे देखील दिसून येते की आता वाहनांचा पुरवठा सुधारण्यास सुरुवात झाली आहे आणि मागणीत देखील वाढ झाली आहे. तसेच सेमीकंडक्टरचे संकट देखील वाहन निर्मात्यांसाठी कमी होताना दिसत आहे. तर नवीन व्हॅनच्या लॉन्च मुळे विक्रीही वाढली आहे. नवीन SUV कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. ज्यामध्ये मारुती सुझुकीच्या नवीन SUV Grand Vitara आणि Brezza यांचा समावेश आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत ब्रेझा अव्वल स्थानावर आहे. तर अलीकडेच लॉन्च झालेल्या ग्रँड विटाराला देखील मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळत आहे. महिंद्रा सारख्या इतर वाहन निर्माते स्कॉर्पिओ एन लॉन्च करून चांगली विक्री करत आहेत. टाटाही आपली उत्पादने सतत अपडेट करत आहे.


दिवाळीतही वाहन उद्योगाला होणार फायदा?


दिवाळीपर्यंत हा ट्रेंड कायम राहील आणि नव्याने दाखल होणाऱ्या वाहनांच्या आधारे खरेदीदारांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा वाहन निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी सप्टेंबर 2022 ची विक्री अजूनही सप्टेंबर 2019 ची पातळी गाठू शकलेली नाही. कारबरोबरच दुचाकींच्या विक्रीतही वाढ झाली असून हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI