Best Loan Offers: सणासुदीच्या काळात नवीन वस्तूंसोबतच वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. म्हणूनच या काळात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले नवीन वाहन लॉन्च करणतात. यातच अनेक जणांची नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र कमी बजेट किंवा वाहन कर्जावरील व्याजाचे अधिक दर, यामुळे ते वाहन खरेदी करणं टाळतात. मात्र आता वाहन कंपन्यांसोबतच फायनान्स कंपन्यांनीही वाहन खरेदीदारांना कमीत कमी ईएमआयवर मोठी कर्जे देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून या दिवाळीत वाहन खरेदीदारांना सहज आणि सुलभ हप्त्यांवर कर्ज देता येईल. कर्जासोबतच कंपन्या नो प्रोसेसिंग फी, नो हिडन चार्ज, नो डॉक्युमेंटेशन असे चार्जेसही घेतले जात नाही.
अनेक फायनान्स कंपन्या स्वस्त वाहन कर्ज देतात. यातच दुचाकी वाहनांवर कर्ज देणारी भारतातील सर्वात मोठी वित्त कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्सने 'फेस्टिव्ह 3D दसरा दिवाळी धमाका' ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी दुचाकी कर्ज घेणाऱ्यांना कमीत कमी आणि आकर्षक व्याजदराने फक्त 5.5 टक्के कर्ज देत आहे. यासोबतच जर कर्जदाराने कर्जाचा EMI वेळेवर भरला तर कंपनी EMI भरणाऱ्या व्यक्तीला EMI परतावा म्हणून परत करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले आहे की, कंपनी कर्जदाराकडून कोणतेही प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्ज घेणार नाही. तसेच कंपनीने दिलेल्या कर्जामध्ये कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय, कर्जदाराकडून आगाऊ म्हणून घेतलेल्या ईएमआयवरही शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत लागू आहे.
फेस्टिव्ह धमाका ऑफर
- कमी व्याजदर : सर्वात कमी व्याजदर 5.5 टक्के ठेवण्यात आला आहे.
- 100% LTV योजना: या योजनेअंतर्गत ग्राहकांना किमान डाउन पेमेंट करावी लागेल.
- 2 Minute Approval Scheme: कंपनीच्या वतीने ग्राहकांना कर्जासाठी त्वरित मंजुरी.
- Triple Zero Plan: या योजनेअंतर्गत, ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क, दस्तऐवजीकरण शुल्क किंवा आगाऊ ईएमआय भरावा लागणार नाही.
- कॅशबॅक ऑफर: ग्राहकाने वेळेवर सर्व हप्ते भरल्यास कंपनी त्याला EMI परत करेल.
महत्वाच्या बातम्या :
- Vida Electric Scooter: एक मिनिटाच्या चार्जवर 1.2 किमी धावते, हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आली
- Citroen C3 Price Hike : Citroen ने वाढवली C3 कारची किंमत; ग्राहकांना 17 हजार रुपये जास्त मोजावे लागणार
Car loan Information:
Calculate Car Loan EMI