BYD Auto 3 Launch Date In India: देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. यातच स्वदेशी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या कारची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता बाजार पाहता अनेक विदेशी कंपनीही भारतात आपले वाहन लॉन्च करत आहे. यातच चिनी कार निर्माता कंपनी  BYD उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी नवीन कार सादर करत आहे. बिल्ड युअर ड्रीम उद्या भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD ऑटो 3 (BYD Atto 3) लॉन्च करेल. ही नवी कार देशातील इतर अनेक कारशी स्पर्धा करेल. चला तर या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

Continues below advertisement

कशी असेल ही नवीन कार 

या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये 49.92 kWh आणि 60.49 kWh चे दोन ब्लेड बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एका चार्जवर अनुक्रमे 345 किमी आणि 420 किमीपर्यंतचा पल्ला गाठता येतो. या कारची संभाव्य किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते. तसेच याची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीत सुरु होऊ शकते. भारतात या कारची कोणाशी होणार स्पर्धा हे जाणून घेऊ.

Continues below advertisement

Tata Nexon EV

टाटाची Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. यात 40.5 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जो एका चार्जवर 437 किमी पर्यंत धावू  शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 17.50 लाख ते 20.04 लाख रुपये आहे.

MG ZS EV

MG ZS EV एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन प्रकारांमध्ये येते. ज्यामध्ये 50.3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 174 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एका चार्जवर 461 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. याची किंमत 22.58 लाख ते 26.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Hyundai Kona Electric

Hyundai ची Kona Electric देखील BYD Auto 3 ला टक्कर देऊ शकते. या कारमध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. ही EV एका चार्जवर 452 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. भारतात याची एक्स-शोरूम किंमत 23.84 लाख ते 24.02 लाख रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI