Second Hand Car Buying Tips: सेकेंड हँड कार खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, यामुळे तुमच्या खिशाला मोठा फटका बसत नाही. तुम्ही जास्त पैसे खर्च न करता चांगली कार (Car) मिळवू शकता. पण, चांगली सेकेंड हँड कार खरेदी करणं (Second Hand Car Buying) इतकं सोपंही नाही, कारण यामध्ये तुमची फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे जुन्या आणि वापरलेल्या कार खरेदी करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. सेकेंड हँड वाहन खरेदी करतानाच्या काही सोप्या टिप्स पाहूया, ज्या तुम्हाला फसवणूक टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.


बजेट ठरवा


वापरलेली कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्यासाठी बजेट ठरवावं लागेल. जेणेकरून त्या बजेटनुसार तुम्हाला पर्याय पाहता येतील. हे बजेट ठरवताना केवळ कारच नाही, तर कारमध्ये काही दुरुस्तीची आवश्यकता असल्यास विमा देखील समाविष्ट केला पाहिजे. बजेट ठरल्यानंतर त्या बजेटनुसार कारचे पर्याय देखील पाहता येतात.


गुगलची मदत घ्या


इंटरनेटच्या मदतीने तुम्ही जे मॉडेल खरेदी करणार आहात त्याबद्दल जाणून घ्या, या मॉडेलबाबत काही अडचण किंवा समस्या आहे का? ते पाहा. त्या मॉडेलवरील ग्राहकांची प्रतिक्रिया पाहा. याशिवाय, कारच्या मालकाला कारच्या सर्व्हिसिंग आणि मेनटेनेंन्स संबंधीची कागदपत्रं देखील विचारा, यावरून तुम्हाला कारची काळजी कशा प्रकारे घेतली गेली आहे? याचा अंदाज येईल.


सर्व कागदपत्रं तपासून घ्या


जेव्हा तुम्ही एखादी वापरलेली किंवा सेकेंड हँड कार खरेदी कराल तेव्हा सर्वात आधी कारशी संबंधित सर्व कागदपत्रं तपासून घ्या. वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांमध्ये वाहनाची आरसी (Registration Certificate), इन्शूरन्स (Insurance) तसेच कारच्या सर्व्हिस रेकॉर्डचे डिटेल्स तपासून घ्या. कार मालकाकडून कार खरेदी करतानाची मूळ प्रतही घ्या, कारण यामध्ये तुम्हाला डिलिव्हरीची तारीख, चेसिस नंबर आणि इंजिन नंबर याबाबतची माहिती मिळेल. ही सर्व कागदपत्रं तपासून घ्या.


कारचं इंस्पेक्शन करा


सेकेंड हँड कार खरेदी करण्याआधी कारचं इंस्पेक्शन करा. यासाठी तुम्ही एखाद्या मेकॅनिकची मदत घेऊ शकता. कोणी विश्वासू माणूस असेल तर त्याच्यासोबत कार तपासा, कारची टेस्ट ड्राईव्ह घ्या. यावरुन तुम्हाला चेसिस नंबरची माहिती देखील मिळेल.


मायलेज तपासून घ्या


तुम्ही कारच्या मायलेजद्वारे कारची स्थिती जाणून घेऊ शकता. जर कारचं मायलेज खूप कमी असेल, तर कार योग्यरित्या चालवली गेली नाही आणि यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मीटरचं रीडिंग आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असेल तरीही ते चागलं नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल


विनाकारण दबाव


अनेकवेळा खासगी डीलर्स तुमच्यावर अशी वाहनं विकण्यासाठी वारंवार दबाव टाकताना दिसतात जे तुम्हाला आवडले देखील नसतात, त्यामुळे नीट विचार करून आणि आपल्या सोयीनुसार निर्णय घ्यावा, जेणेकरून चुकीचा व्यवहार टाळता येईल.


हेही वाचा:


पेट्रोल गरम केलं तर काय होईल? गॅस पेटवताच आग लागेल का? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI