Honda Activa Limited Edition: सणासुदीच्या आधीच होंडा मोटारसायकल आणि स्कूटर कंपनीने भारतात त्यांच्या सर्वात लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्टिव्हाचं (Honda Activa) लिमिटेड एडिशन लाँच केलं आहे. भारतातील सर्वाधिक विकली जाणारी नवीन अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे - डीएलएक्स आणि स्मार्ट.  या दोन व्हर्जनची किंमत 80,734 आणि 82,734 रुपये अशी आहे.


अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या (Activa Scooter) या नवीन व्हर्जनमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. ऐन सणासुदीच्या तोंडावर होंडाने (Honda) स्कूटीचं लिमिटेड व्हर्जन लाँच केलं आहे. नवीन Activa साठी बुकिंग देखील सुरू झालं आहे आणि तुम्ही देशातील कोणत्याही Honda Red Wing डीलरशिपवरून स्कूटर बुक करू शकता. ही स्कूटर टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) आणि हिरो प्लेजरला (Hero Pleasure) टक्कर देते.


डिझाईन (Honda Activa Limited Edition Design)


नवीन Honda Activa Limited Edition व्हिज्युअल सुधारणांसह येते. लेटेस्ट स्कूटर डार्क कलर थीम आणि ब्लॅक क्रोमसह लाँच झाली आहे. त्याच्या बॉडीवरील स्ट्रिप ग्राफिक्समुळे ती अप्रतिम दिसते. Activa ला 3D सिम्बॉल देखील देण्यात आला आहे. स्कूटरच्या जवळपास प्रत्येक भागाला डार्क थीम, डार्क फिनिशिंग देण्यात आली आहे.


पॉवरट्रेन (Honda Activa Limited Edition Powertrain)


नवीन अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला पॉवर देण्यासाठी 109.51cc सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या मदतीने 7.74 bhp ची कमाल पॉवर आणि 9.90 Nm चा पीक टॉर्क जनरेट होऊ शकतो. कंपनी या स्कूटरवर 10 वर्षांचं वॉरंटी पॅकेज देखील देत आहे, ज्यामध्ये 3 वर्षांचा स्टॅडर्ड आणि 7 वर्षांचा ऑप्शनल एक्सटेंड समाविष्ट आहे.


रंग (Honda Activa Limited Edition Colour)


Activa Limited Edition मध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल सेरेन ब्लू कलर यापैकी निवडू शकता. याशिवाय नवीन स्कूटरमध्ये अलॉय व्हील आले आहेत. त्याचा टॉप व्हेरिएंट होंडाच्या स्मार्ट की तंत्रज्ञानासह (Smart Key Technology) उपलब्ध असेल. अ‍ॅडव्हान्स फीचर्स या स्कूटरला खास बनवतात.


तुम्हीही स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही होंडाची ही स्कूटर (Honda Activa Scooty), म्हणजेच अ‍ॅक्टिव्हा तुमच्या लिस्टमध्ये पर्याय म्हणून ठेवू शकता. 


हेही वाचा:


Traffic Rules of World: 'या' देशात गाडीचं पेट्रोल मध्येच संपल्यास आकारला जातो दंड; भारतात तर पोलिसही करतात मदत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI