Kia Seltos Facelift In India: भारतातील टॉप सेलिंग SUV Kia Seltos ही मध्यम आकाराची एसयूव्ही सेगमेंट कार आहे. Kia Seltos भारतीय बाजारपेठेत जवळपास तीन वर्षांपासून वर्चस्व गाजवत आहे. अशातच आता Kia Seltos च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला Kia Seltos चे नवीन रूप भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळेल. कंपनी आगामी काळात Kia ची नवीन कार Kia Seltos Facelift लॉन्च करणार आहे. सध्या भारतात याची चाचणी सुरू झाली आहे. कंपनीने अलीकडेच आपली पहिली इलेक्ट्रिक कार Kia EV6 लॉन्च केली होती. आता कंपनी Kia Seltos Facelift लॉन्च करणार असून यात अनेक नवीन फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार. चला तर Kia Seltos Facelift कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापासून Kia Seltos च्या विक्रीत घट झाली आहे. हेच लक्षात घेऊन कंपनी याच्या अपडेट मॉडेलवर काम करत आहे. कंपनीने आपल्या या आगामी कारची भारतात चाचणी सुरू केली आहे. ही कार पुढील वर्षाच्या सुरुवातीस भारतात लॉन्च केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. कंपनी Kia Seltos Facelift ची परदेशातील वेगवेगळ्या हवामान आणि परिस्थितींमध्येही चाचणी करत आहे. 


इंजिन 


आपल्या या नवीन एसयूव्हीमध्ये कंपनी  2.0-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. जे 146bhp पॉवर आणि 179Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लॉन्च करू शकते.


फीचर्स 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात नवीन हेड लाइन, नवीन फ्रंट बंपर आणि नवीन फ्रंट ग्रिलसह बरेच कॉस्मेटिक अपडेट्स मिळू शकतात. तर याची बाहेरील बाजू सध्याच्या मॉडेलपेक्षा खूपच आकर्षक असेल. यामध्ये ग्राहकांना पूर्णपणे नवीन इंटीरियर लूक देखील पाहायला मिळेल. जे उत्कृष्ट डॅशबोर्ड डिझाइन, स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अपडेटेड कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल. 


इतर महत्वाची बातमी: 


Kia EV6 electric: एका चार्जमध्ये गाठते 528 किमी, KIA EV6 भारतात लॉन्च


Car loan Information:

Calculate Car Loan EMI