BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत नवीन BMW G 310 RR साठी प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे. कंपनी आपल्या नवीन मिड-लेव्हल स्पोर्ट्स बाईक्स लाँच करण्यासाठी बाजारात जागा तयार करत आहे. म्हणूनच कंपनी या सेगमेंटमध्येही बाईक लॉन्च करणार आहे. आत्तापर्यंत BMW भारतीय बाजारपेठेत प्रीमियम बाईक विकत होती. नवीन 310 सीसी बाईक 15 जुलै रोजी लॉन्च झाल्यानंतर याला भारतात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.


लूक आणि डिझाइन


कंपनीने या नवीन बाईकचा टीझर रिलीज केला आहे. BMW G 310 RR ची डिझाइन Apache RR 310 च्या डिझाइनशी मिळतीजुळती आहे. याला RR 310 ची Rebadged Version देखील म्हणता येईल. कंपनीने आगामी या बाईकला लाल, निळा आणि जांभळा रंग देण्यात आला आहे. ज्यामुळे याला एक खास लुक मिळतो.


इंजिन 


लूकसह या बाईकचे मेकॅनिक Apache सारखेच असू शकते. यात Apache मध्ये दिलेले 310 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन BMW G 310 Twins मध्ये देखील वापरले आहे. हे इंजिन 34 hp ची कमाल पॉवर आणि 27.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.


नवीन BMW G 310 RR मध्ये वापरलेले प्लॅटफॉर्म कंपनीच्या TVS Motors च्या भागीदारीत विकसित केले गेले आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या मॉडेल्ससाठी हेच प्लॅटफॉर्म वापरतील. BMW G 310 GS बाईक देखील याच प्लॅटफॉर्म आधारित असेल. याशिवाय हाच प्लॅटफॉर्म TVS Apache RR 310 मध्ये वापरला गेला आहे. 


किती असेल किंमत?


नवीन BMW RR 310 (BMW RR 310) ची किंमत Apache RR 310 (Apache RR 310) च्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. मात्र या बाईकची किंमत सुमारे 2.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल असा अंदाज आहे. कंपनीने लॉन्च केल्यानंतर ही बाईक भारतीय बाजारपेठेत तिच्या सेगमेंटमध्ये KTM RC 390 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI