Kia Ev6 Launched: इलेक्ट्रिक कारच्याच्या सेगमेंटमध्ये सतत पुढे जात असलेल्या Kia india ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही कार तुम्हाला अधिक चांगल्या रेंजसह मिळेल. भारतात या कारच्या फक्त 100 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध होत्या, ज्या लॉन्चपूर्वी विकल्या गेल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kia EV6 चे 355 बुकिंग आधीच झाले होते. चला तर या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


आकर्षक लूक 


Kia EV6 कंपनीने क्रॉसओवर डिझाइनसह ही कार नवीन अवतारात लॉन्च केली आहे. Kia EV6 वाहनाची लांबी 4.7 मीटर आहे. लांब बोनेट आणि विंडोच्या मोठ्या काचेसह, यात डिजिटल टायगर नोज ग्रिल आणि एलईडी लाईट्स सारख्या फीचर्समुळे बाहेरचा भाग मजबूत आणि आकर्षक दिसतो. या कारमध्ये तुम्हाला स्नो व्हाइट पिअर, मूनस्केप, अरोरा ब्लॅक पर्ल, रनवे रेड आणि यॉट ब्लू असे 5 आकर्षक रंग पाहायला मिळतील.


फीचर्स 


Kia EV6 मध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अॅम्बियंट लाइट्स आणि वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स दिले आहे. केबिनबद्दल सांगायचे तर, तुम्हाला यात ब्लॅक स्यूडे सीट, विगन लेदर बोल्टसह ऑल-ब्लॅक आकर्षक इंटीरियरमध्ये पाहायला मिळेल. यात पाच लोक आरामात बसू शकतात. पुढची सीट हीटिंग आणि कूलिंग सुविधेसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आहे. तसेच मागील सीटखाली इलेक्ट्रिक सनरूफसह तीन पिन सॉकेट देण्यात आले आहे. 


सेफ्टी फीचर्स 


केवळ आकर्षक दिसण्याच्या बाबतीतच नाही तर, Kia EV6 ही सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उत्तम कार आहे. ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, स्पीड असिस्टन्स, लेन असिस्ट सिस्टीम आणि सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टीम सारखी फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. ही कार सीट बेल्ट प्री-टेन्शनर, 6 एअरबॅग्ज आणि लोड लिमिटरसह लॉन्च करण्यात आली आहे. Kia EV6 ने युरो NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग देखील मिळवली आहे.


किंमत 


Kia EV6 ची प्रारंभिक किंमत 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Kia EV6 साठी 12 शहरांमधील 15 डीलरशिपवर बुकिंग सुरू करण्यात आली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI