Upcoming Tata Cars in India : भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) नुकत्याच आपल्या नेक्सन (Tata Nexon), हॅरियर (Harrier) आणि सफारी SUV ला नवीन डार्क रेड एडिशनमध्ये लॉन्च केलं. तसेच, टाटा मोटर्स लवकरच 2023 सफारी आणि हॅरियर SUV नवीन BS6 स्टेज 2 किंवा RDE अनेक फीचर अपडेट्ससह बाजारात लॉन्च करेल. तसेच, कंपनी लवकरच आपली पंच SUV आणि Altroz हॅचबॅक सारख्या कार CNG व्हर्जनमध्ये लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनी 2024 पर्यंत देशात अनेक SUV कार लॉन्च करणार आहे.
नवीन टाटा नेक्सन
टाटा मोटर्स लवकरच आपली Nexon SUV नवीन सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. यामध्ये, इंटिरिअर कर्व SUV सारखे असण्याची शक्यता आहे. याबरोबरच पुढील आणि मागील प्रोफाइल देखील पूर्णपणे नवीन दिसेल. नेक्सन SUV मध्ये बदल म्हणून, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि व्हॉईस कमांड फंक्शनला सपोर्ट करणारी नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 2024 मध्ये Tata Nexon ला नवीन 1.2L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे 125bhp आणि 225 Nm चे आऊटपुट जनरेट निर्माण करू शकेल. ही कार मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांसह ऑफर केली जाईल.
टाटा कर्व
Tata Motors ने 2023 ऑटो एक्सपोमध्ये Curvv SUV कूप संकल्पना प्रदर्शित केली आहे. ही नवीन कार भारतात 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ही कार टाटाच्या GEN 2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह बाजारात येणार आहे. टाटा कर्व लॉन्च झाल्यानंतर ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या कारशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. कारमध्ये 10.25-इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. या कारला 1.2L, 3-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल, जे 5,000rpm वर 125PS पॉवर आणि 1700-3500rpm वर 225 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. कारला इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये 40-50kWh बॅटरी पॅक मिळेल, जो 500km ची रेंज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.
नवीन हॅरियर EV
टाटा मोटर्सने 2023 ऑटो एक्सपोमध्ये EV संकल्पना म्हणून हॅरियर सादर केली. हॅरियर इलेक्ट्रिकची विक्री 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन मॉडेल लँड रोव्हरच्या ओमेगा-एआरसी प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. यामध्ये टाटाचे जनरल 2 EV आर्किटेक्चर देखील आहे. टाटा ने अद्याप याबद्दल जास्त माहिती दिली नसली तरी 60kWh च्या बॅटरी पॅकसह 400-500km ची रेंज मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI