PMV Electric Car : सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार असो किंवा बाईक ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. याचं कारण म्हणजे कमी पैशांत जास्त सुविधा मिळतात. याकरता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची स्पर्धा सुरू आहे. याबरोबरच या सेगमेंटमध्ये नवीन ब्रँड्सही येत आहेत. याच क्रमाने, लवकरच मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक पीएमव्ही इलेक्ट्रिक कारची (PMV Electric Car) एन्ट्री होणार आहे. कंपनी या महिन्याच्या 16 तारखेला आपली पहिली इलेक्ट्रिक कार Micro Eas-E भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. कंपनीने या कारचे बुकिंगही सुरू केले आहे. पीएमव्हीच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहक केवळ 2,000 रुपयांमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक कार प्री-बुक करू शकतात. या कारची किंमत सुमारे 4 लाख रुपये असू शकते. सध्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्सची Tiago EV आहे, जी 8.5 लाख रुपयांना मिळते.
ही कार कशी असेल?
PMV इलेक्ट्रिक म्हणजेच पर्सनल मोबिलिटी व्हेईकलचे म्हणणे आहे की, या कारमध्ये बरेच प्रगत तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. ज्यामध्ये सहज ड्रायव्हिंग मोड आणि क्रूझ कंट्रोल देखील उपलब्ध असेल. या दोन सीटर कारमध्ये एक व्यक्ती समोर बसेल आणि दुसरी व्यक्ती मागे बसेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, PMV चे संस्थापक कल्पित पटेल म्हणतात की, या मॉडेलचा प्रोटोटाईप तयार करण्यात आला आहे आणि कंपनी ही कार 16 नोव्हेंबर रोजी सादर करेल. तर ही कार पुढील वर्षी विक्रीसाठी उपलब्ध होईल. या कारला चार दरवाजे आणि दोन सीट मिळतील. ज्याचा वापर दैनंदिन कामांमध्ये करण्यासाठी केला जातो. कार तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये आणि पेंट स्कीममध्ये सादर केली जाईल. लॉन्चच्या वेळी त्याबद्दल अधिक तपशील उघड केला जाईल.
आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
भारतातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्सची Tiago EV आहे, ज्याच्या किमती 8.49 लाखांपासून सुरू होतात. ही कार नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. ज्याची विक्री पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. ही कार दोन प्रकारच्या बॅटरी पॅकसह येते.
महत्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI