Tata Harrier and Safari Price Hiked : प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने हॅरियर (Harrier) आणि सफारीच्या (Safari) किंमती वाढवल्या आहेत. या कारची प्रीमियम एसयूव्हीमध्ये गणना केली जाते. टाटाने किंमतीत वाढ केल्यामुळे मात्र कार घेण्यासाठी ग्राहकांना आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. टाटाने हॅरियरच्या किमती 31,000 रुपयांनी आणि सफारीच्या किंमती तब्बल 20,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने किंमत वाढविण्याबरोबरच कारच्या फिचर्समध्येदेखील अतिरिक्त बदल केले आहेत. ज्यामुळे या कार अधिक आकर्षक बनल्या आहेत. या कारमध्ये कोणते फीचर्स वाढवण्यात आले आहेत ते जाणून घेऊयात.
हॅरियर नवीन वैशिष्ट्ये (Tata Harrier New Features) :
हॅरियरमध्ये नवीन वैशिष्ट्य म्हणून, त्याच्या सर्व व्हेरिएंटना आता पुढच्या रांगेत यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल. त्याच वेळी, हे वैशिष्ट्य त्याच्या XZ ट्रिमच्या वरील सर्व व्हेरिएंटमध्ये दिसेल. तसेच, कारला आता ड्रायव्हर डोस-ऑफ अलर्ट, ड्राईव्ह अॅनालिटिक्स, ईएसपी, पोस्ट-इम्पॅक्ट ब्रेक ऍक्टिव्हेशन, पॅनिक ब्रेक अलर्ट, मॅन्युअल डीटीसी चेक, ऑटो इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, वायरलेस चार्जर, XZ+ ट्रिम्सवरील वापर मिळेल. अॅनालिटिक्स, आणि डिस्क ब्रेक सर्व चार चाकांवर देखील उपलब्ध असतील.
सफारीची नवीन वैशिष्ट्ये (Tata Safari New Features) :
टाटा सफारीला गोल्ड एडिशनमध्ये मानक म्हणून iRA फिचर्स मिळतील आणि XZ+ व्हेरिएंटला आरामदायी हेड रिस्ट्रेंट मिळेल, बाकी सर्व काही समान राहील. सफारी आणि हॅरियर या दोन्हींवर समान इंजिन उपलब्ध आहे. हे 1956cc 4-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन आहे, जे 168 bhp ची कमाल पॉवर आणि 350 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या दोन्ही कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. यांसारखे बरेच नवीन फिचर्स या सफारीच्या कारमध्ये देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
'या' SUV कारची किंमत एका वर्षात 4 पट वाढली! Citroen C5, Tucson, Harrier आणि Hector शी स्पर्धा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI