Hyundai Car : दिग्गज कार निर्माता कंपनी Hyundai पुढील वर्षी आपली नवीन SUV (Ai3 CUV) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार टाटा पंच, Citroen C3 Nissan Magnite आणि Renault Kieger सारख्या कारला टक्कर देणार आहे. पण, त्याआधी ह्युंदाईच्या या कारमध्ये काय विशेष आहे, कोणते फिचर्स खास आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

  


Hyundai AI3 SUV :


Hyundai ची नवीन SUV कार, Ai3 CUV (Compact Utility Vehicle), Hyundai Grand i10 Nios आणि Hyundai Aura सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. ज्यावर कंपनीने नवीन Casper Micro SUV आधीच तयार केली आहे. असे मानले जात आहे की कंपनी ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात कमी किंमतीत देऊ शकते. यामुळे टाटा पंच, रेनॉल्ट चिगर आणि निसान मॅग्नाइट यांसारख्या बाजारात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कारशी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.


hyundai ai3 इंजिन :


कंपनी आपल्या Ai3 CUV कारमध्ये i10 Nios आणि Aura मध्ये ऑफर केलेल्या 1.2-L पेट्रोल मोटरचा वापर करणार आहे. जे 6,000 rpm वर जास्तीत जास्त 83 PS पॉवर आणि 4,000 rpm वर 114 Nm चे सर्वोच्च टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, जर आपण या कारच्या ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो (AMT) दिले जाईल. या सेगमेंटमधील वाढ लक्षात घेता या कारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एंट्री-लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये, कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून दरमहा सुमारे 20,000 युनिट्सची विक्री केली आहे. टाटा पंच आणि Citroen C3, Nissan Magnite आणि Renault Chiger सारख्या कार या सेगमेंटमध्ये आधीपासूनच आहेत.


Hyundai AI3 चे फिचर्स :


या नवीन SUV मध्ये, Grand i10 Nios आणि Venue कॉम्पॅक्ट SUV मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक एसी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम इत्यादी वैशिष्ट्ये पाहता येतील. कंपनी 50,000 युनिट्स गृहीत धरून या कारच्या वार्षिक विक्रीच्या लक्ष्यासाठी तयारी करत आहे. गेल्या वर्षी Hyundai Motor India ने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 1,470 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.


महत्वाच्या बातम्या : 


Upcoming Car : दमदार लूक आणि मायलेजही जबरदस्त; नवीन Toyota Innova HyCross Hybrid कार लवकरच लॉन्च होणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI