Upcoming Cars in India 2023: भारतात MPV सेगमेंटमधील कार खूप पसंत केल्या जातात. या कारच्या आसन क्षमता जास्त असते, तसेच यात जास्त स्पेस असल्याने या कार्सला भारतात मोठी मागणी आहे. तुम्हालाही MPV कार आवडत असतील तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, जे पुढील वर्षी 2023 ला लॉन्च केले जातील.


Toyota Innova Crysta Facelift 2023 : इनोव्हा क्रिस्टा फेसलिफ्ट


नवीन इनोव्हा हायक्रॉस सादर करताना टोयोटाने सांगितले होते की, इनोव्हा क्रिस्टा डिझेलची विक्री लवकरच सुरू होईल. याची बुकिंग जानेवारी 2023 पासून सुरू होईल. या कारला नवीन उत्सर्जन नियमांनुसार अपडेटेड डिझेल इंजिन मिळेल आणि तिच्या लूकमध्ये किरकोळ बदल केले जातील. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 2.4-लिटर D-4D टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळू शकते.


Kia Carnival 2023: किया कार्निवल


किआ कार्निवलची फेसलिफ्ट व्हर्जन 2021 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आले होते. आता याचे अपडेटेड मॉडेल  पुढील वर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, सराउंड व्ह्यू मॉनिटर, फॉरवर्ड कोलिजन अव्हेंडन्स असिस्ट आणि हाय बीम यासारखे फीचर्स मिळतील. नवीन कार्निव्हलची लांबी 5155 मिमी, रुंदी 1995 मिमी आणि उंची 1775 मिमी आहे.


Hyundai Stargazer 2023 : ह्युंदाई स्टारगेझर


Hyundai ने आपली नवीन MPV कार Stargazer आधीच इंडोनेशियामध्ये सादर केली आहे. Stargazer च्या भारतातील खास व्हर्जनमध्ये Kia Carens प्रमाणेच 1.5L VTVT NA पेट्रोल इंजिन, 1.4L टर्बो GDi पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिनसह अनेक आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी एर्टिगा, किया केरेन्स आणि XL6 बरोबर स्पर्धा करेल.


Citroen C3 MPV


Citroen लवकरच आपल्या C3 हॅचबॅकवर आधारित 7-सीटर MPV देखील देशात लॉन्च करू शकते. ही कार अनेकवेळा टेस्ट दरम्यान दिसली आहे. ही कार आकाराने मोठी असेल कंपनी यात अनेक नवीन फीचर्स देऊ शकते. ही कार भारतीय बाजारपेठेत रेनॉल्ट ट्रायबर आणि मारुती ट्रायबरला टक्कर देऊ शकते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Best Mileage Bike: 1000 रुपयात धावणार 900 किलोमीटर, 'ही' आहे मायलेज किंग बाईक


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI