Seven Seater Cars: भारतात मोठ्या आकाराच्या आणि अधिक आसनक्षमतेच्या असलेल्या कार अधिक पसंत केल्या जातात. यामध्येच 7-सीटर SUV आणि MPV ला देशात जास्त मागणी आहे. याचं मोठं कारण म्हणजे यात जास्त लोक बसू शकतात, शिवाय यात अधिक सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा देखील मिळते. ज्या लोकांना अशा गाड्या आवडतात त्यांच्यासाठी नवीन वर्ष आणखी चांगलं ठरणार आहे. अशातच आपण नवीन वर्षात भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणाऱ्या 5 नवीन 7-सीटर कारबद्दल अधिक माहिती अजनून घेऊ.
Mg Hector Plus Facelift 2023 : एमजी हेक्टर प्लस फेसलिफ्ट
एमजी मोटर इंडियाने माहिती दिली आहे की, कंपनी 5 जानेवारी 2023 रोजी अपडेटेड हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या किंमती जाहीर करणार आहे. नवीन 2023 MG Hector Plus च्या फ्रंट एंडमध्ये आणखी बदल पाहिले जाऊ शकतात. यात एलईडी डीआरएलसह नवीन डिझाइन केलेले ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअप मिळेल. नवीन अलॉय व्हीलसोबतच डॅशबोर्ड, सेंट्रल कन्सोल आणि स्टिअरिंग व्हीलमध्येही बदल करण्यात येणार आहेत. यात ADAS फीचर देखील मिळणार आहे.
Toyota Innova Hycross 2023 : टोयोटा इनोव्हा हायक्रॉस
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस नुकतीच सादर करण्यात आली आहे, जी जानेवारी 2023 पासून विकली जाऊ शकते. ही कार MPV G, GX, VX, ZX आणि ZX (O) ट्रिममध्ये उपलब्ध असेल. यात 2.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल. ADAS, मोठे पॅनोरॅमिक सनरूफ, 9-स्पीकर JBL ऑडिओ सिस्टीम, कनेक्टेड कार टेक यांसारखी फीचर्स या कारमध्ये उपलब्ध असतील. याचे मायलेज 21.1 किमी/ली आहे.
Tata Harrier Facelift 2023 : टाटा हॅरियर फेसलिफ्ट
इतर ऑटो संबंधित बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI