Toyota Innova Hycross Hybrid: वाहन उत्पादक कंपनी इनोव्हा आपल्या वाहनांना वारंवार अपडेट्स करत नाही. यामध्ये नवीन इनोव्हा हायक्रॉस ही एक मोठी गोष्ट आहे. कंपनीसाठी ही एक महत्वाची कार आहे. कारण या एमपीव्हीसाठी हा मोठा बदल आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या विपरीत, हायक्रॉस मोनोकोक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. आता यामध्ये पेट्रोल हायब्रीड पॉवरट्रेन देखील मिळतो. ही कार फक्त आपल्या जुन्या ग्राहकांनाच आवडणार की नवीन ग्राहकांनाही आकर्षित करणार? हे जाणून घेण्यासाठी आम्ही याची शॉर्ट ड्राइव्ह घेतली आहे.    


लूक 


नवीन इनोव्हा हायक्रॉस दिसायला मोठी असून ही दिसायला hSUV सारखी आहे. याला आता मोठ्या ग्रिलसह एक उपराईट लूक मिळतो. 4755 मिमी लांबीसह, नवीन इनोव्हा हायक्रॉस क्रिस्टापेक्षाही मोठी आहे. स्लिम एलईडी लाईट, लहान ओव्हरहॅंग्स आणि क्रॉसओवर सारख्या दिसणार्‍या रेक विंडो लाइनसह डिझाइन खूपच आकर्षक आहे. यासोबतच यात नवीन रंगांचा प्रीमियम टचही जोडण्यात आला आहे.


याचे मोठे दरवाजे उघडताच आतमध्ये SUV सारखी ड्रायव्हिंग पोझिशन दिसून येते. टोयोटाने यामध्ये बरेच बदल केले आहेत. याच्या केबिनमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाने भरलेले फीचर्स दिसते. या हायब्रिडमधील सर्व माहितीसाठी तुम्हाला मध्यभागी मोठ्या टचस्क्रीनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. सेंटर कन्सोलवर येत असताना त्याची पोझिशनिंग खूप चांगली आहे आणि यात टोयोटा कारमधील सर्वोत्तम टचस्क्रीन देखील मिळते. यामध्ये ग्राफिक्स, आयकॉन्स चांगले दिसतात. सॉफ्ट टच इन्सर्ट आणि लेदर अपहोल्स्ट्रीच्या बाबतीत क्रिस्टापेक्षा याच्या गुणवत्तेत बरीच सुधारणा झाली आहे.


फीचर्स 


नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये तुम्हाला एक मोठा डबल पेन पॅनोरामिक सनरूफ, एक प्रशस्त केबिन, कुल आणि पॉवर असलेली फ्रंट सीट, मल्टी झोन ​​क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9 स्पीकर JBL ऑडिओ सिस्टम, पॉवर्ड हँडब्रेक सारखे फीचर्स मिळतात. यात वायरलेस स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.


इंजिन 


यामध्ये 2.0 L पेट्रोल इंजिनशी जोडलेली इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी कम्बाईन 184 bhp पॉवर जनरेट करते. यात ECVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कमी वेगावर ही गाडी चालवताना याचे टॉर्क रिफाइनमेंट आणि स्मुथनेस उत्तम आहे. गाडी वेगाने चालवताना इंजिन थोडं आवाज करतं. चांगल्या ग्राउंड क्लीयरन्समुळे कार खूप स्मूथ वाटते.


मायलेज 


इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड पूर्ण टाकीसह 1000 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. या कारचे मायलेज 21 kmpl पेक्षा जास्त, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर आम्हाला ड्राइव्ह दरम्यान 18 kmpl च्या जवळपास मायलेज मिळाला. जे तिच्या आकाराचा विचार करता खूप चांगलं आहे. प्रीमियम लूक, फीचर्स आणि स्मूथ हायब्रिड पॉवरट्रेनसह 20-30 लाखांच्या किमतीत यात बरेच काही देण्यात आले आहे. दरम्यान, आम्हाला या कारचा रंग, डिझाइन, कंफर्ट, इंजिन रिफाइनमेंट , फीचर्स आणि मायलेज खूप आवडलं. मात्र तरीही यात डिझेल इंजिनची पॉवर आणि टॉर्कचा अभाव आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI