Royal Enfield 450cc Roadster: भारतात रॉयल एनफिल्ड बाईकची एक वेगळीच क्रेज आहे. कंपनीच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. यातच कंपनी सध्या 350cc ते 650cc पर्यंतच्या अनेक नवीन बाईकवर काम करत आहे. यासह कंपनी एक नवीन 450cc इंजिन प्लॅटफॉर्म देखील तयार करत आहे. ज्याचा वापर रॉयल एनफिल्ड आपल्या नवीन हिमालयन 450 सह 5 नवीन बाईक तयार करण्यासाठी करणार आहे. नवीन रॉयल एनफील्ड हिमालयन 450 काही दिवसांपूर्वी लेह-लडाखमध्ये ऑफ-रोड टेस्टिंग दरम्यान दिसली होती. आता नवीन Royal Enfield 450cc Roadster भारताबाहेर टेस्टिंग दरम्यान दिसली आहे.
लूक
नवीन रॉयल एनफील्ड 450 सीसी बाईक ही एक ऑल-रेट्रो रोडस्टर आहे. बाईकला एक स्वूपिंग गोल टाकी मिळते, जी मोठ्या सिंगल-पीस सीटसारखी दिसते. यासोबतच एलईडी लाइटिंग सिस्टिमसह एलईडी हेडलॅम्प सेटअप, एलईडी टर्न इंडिकेटर आणि एलईडी टेल-लाइट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हिमालयन 450 मध्ये देखील हेच टर्न इंडिकेटर दिसतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन राइड-बाय-वायर थ्रॉटल, डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम मिळेल. यासोबतच बाईकमध्ये ऑप्शनल हीटेड ग्रिप, हँडगार्ड आणि हँडलबारही दिले जाऊ शकतात.
कधी होणार लॉन्च?
Royal Enfield 450cc Roadster लॉन्च झाल्यावर याची स्पर्धा BMW 310 GS, KTM 390 Adventure आणि Yezdi सारख्या Adventure बाईकशी होईल. ही नवीन बाईक 2023 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च केली जाऊ शकते. दरम्यान, ही बाईक भारतात BMW G 310 GS ला टक्कर देईल. ज्यामध्ये 313cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 33.52 bhp पॉवर आणि 28 Nm टॉर्क जनरेट करते. समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह, BMW G 310 GS अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. याचे वजन 175 किलो आहे आणि याची इंधन टाकीची क्षमता 11 लीटर आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.15 लाख रुपये आहे.
इतर ऑटो संबंधित बातम्या :
Samruddhi Mahamarg : नऊ एअरबॅग्ज, फक्त 7.4 सेकंदात पकडते 100 kmpl वेग; फडणवीस चालवत असलेल्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क
Car loan Information:
Calculate Car Loan EMI