TVS Ronin images leaked online: दिग्गज वाहन उत्पादक कंपनी TVS आपली नवीन बाईक लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही बाईक फक्त दिसायलाच जबरदस्त नसून याचे इंजिनही दमदार आहे. कंपनीच्या या अपकमिंग बाईकचे नाव आहे TVS Ronin 225cc. कंपनीच्या या आगामी बाईकचे फोटो लीक झाले आहे. या बाईकचे फोटो लीक होताच अनेक बाईकप्रेमी ही बाईक गुगलवर सर्च करून पाहत आहे. कंपनी आपली ही बाईक 6 जुलै 2022 रोजी लॉन्च करू शकते, अशी चर्चा आहे. नवीन TVS बाईकचे अधिकृत स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. मात्र ही बाईक 225cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह 20bhp च्या पॉवर आउटपुटसह येऊ शकते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळेल.



याच्या लीक झालेल्या फोटोत दिसत असल्याप्रमाणे यात T-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्ससह गोल हेडलॅम्प्स मिळतील. तसेच यात टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, युनिक हँडलबार आणि एक सपाट सीट मिळेल. जी रायडींग दरम्यान चांगला अनुभव देईल. लीक झालेल्या फोटोंनुसार, यामध्ये सिंगल-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील देण्यात आला आहे. बाईकला पुढील बाजूस अप-डाउन फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन मिळेल. ब्रेकिंगसाठी, पुढील आणि मागील डिस्क ब्रेक उपलब्ध असतील. यात ड्युअल-चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देखील मिळेल.


दरम्यान, TVS ने अलीकडेच रिव्हर्स मल्टी-कलर LCD डिजिटल क्लस्टरसह Radeon अपडेटड बाईक लॉन्च केली आहे. यामध्ये टॉप आणि अॅव्हरेज स्पीड, रियर टाइम मायलेज, सर्व्हिस इंडिकेटर, घड्याळ आणि कमी बॅटरी इंडिकेटर अशी अनेक फीचर्स देण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI