Toyota Fortuner Price Hike: टोयोटा मोटर्सची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही कार फॉर्च्युनरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या कारची वाढलेली किंमत 1 जुलैपासून लागू झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी 1.14 लाख रुपये अधिक खर्च करावे लागतील. मागील वर्षीच टोयोटाने फॉर्च्युनरचे लीजेंडर 4×2 प्रकार देखील सादर केले होते. तसेच कंपनीने याचे फेसलिफ्ट प्रकार देखील लॉन्च केले होते. टोयोटाच्या या फुल साइज एसयूव्हीची ग्राहकांमध्ये  वेगळीच क्रेझ आहे.


आपल्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या फॉर्च्युनरची किंमत 31.79 लाख रुपयांपासून सुरू होऊन 48.44 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे. फक्त एक वर्षापूर्वी, कंपनीने फॉर्च्युनरच्या प्रकारांमध्ये नवीन 4×4 आवृत्ती समाविष्ट केली होती. यासोबतच GR-Sport चा एक प्रकार देखील यामध्ये उपलब्ध आहे. जो कंपनीने नुकताच लॉन्च केला आहे.


जाणून घ्या किती वाढल्या किंमती


कंपनीच्या फॉर्च्यूनर 4×2 प्रकारात 61,000 पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 4×4 प्रकार 80000 रुपयांनी महाग झाला आहे. लेजेंड आणि जीआर-स्पोर्ट व्हेरियंटमध्ये सर्वाधिक किंमतींमध्ये 1.14 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच इतर सर्व प्रकारांमध्येही किंमती 61000-80000 रुपयांनी वाढल्या आहेत. 


दरम्यान, अलीकडेच टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच आपली नवीन मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर Hyryder सादर केली आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्पेसमध्ये आहे. याची 1.5l पेट्रोल मॅन्युअलची प्रारंभिक किंमत सुमारे 11 लाख असू शकते. तर याच्या हायब्रिडवर प्रकारची किंमत 20 लाख रुपये असू शकते. याच्या किंमतीबद्दल अद्याप कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI