Honda Upcoming Car : ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी होंडा (Honda) भारतीय ग्राहकांसाठी दोन नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. यावर होंडा वेगानं काम करत आहे. होंडा दोन दमदार कार बाजारात आणणार असून या दोन्ही कार Honda Amaze च्या अपडेटेड आर्किटेक्चरवर आधारित असतील. या कारची अनेक वैशिष्ट्य पाचव्या पिढीतील होंडा सिटी मिडसाईज सेडान सारखीच असतील. होंडाच्या भारत (India) आणि जपानमधील (Japan) मुख्यालयात या गाड्यांच्या अभियांत्रिकी आणि स्टायलिंगवर काम सुरु आहे.
कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्हीला (Compact SUV) 3US असं कोडनेम दिलं आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तो भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. Honda WR-V ची भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सब-4-मीटर सेगमेंटमध्ये विक्री केली जाते. पण ही कार या विभागातील आधुनिक कारशी स्पर्धा करत नाही. होंडाच्या नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारच्या लॉन्चनंतर, WR-V चं उत्पादन थांबेल की, पुढे चालू राहील याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मारुती ब्रेझाशी थेट स्पर्धा
Honda ची अपकमिंग नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची स्पर्धा मारुती ब्रेझा (Maruti Brezza) शी होणार आहे. याव्यतिरिक्त टाटा नेक्सॉन (Tata Nexon), किआ सॉनेट (Kia Sonnet) , निसान मॅग्नाइट (Nissan Magnite), हुंडाई वेन्यू फेसलिफ्ट (Hyundai Venue facelift) यांसारख्या भारतीय बाजारपेठेतील कारशीही होंडाच्या आगामी कारची स्पर्धा असेल. आगामी SUV आधुनिक शैलीसह येईल जी Honda BR-V सारखी असू शकते. तसेच, ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 1.5 लिटर डिझेल इंजिनसह बाजारात लॉन्च केली जाऊ शकते.
होंडा अमेझ (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) या होंडाच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या आहेत. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या एसयूव्ही सेगमेंटच्या दिशेनं पावलं टाकताना दिसत आहेत. अशातच होंडाही या सेगमेंटमध्ये पदार्पण करण्याच्या विचारात आहे. होंडाच्या SUV सेगमेंटमधील कार्सना ग्राहकांची पसंती मिळणार की, नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Car : Toyota Urban Cruiser Hyryder, Hyundai Creta की Kia Seltos कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती
- टोयोटाच्या नवीन Urban Cruiser Hyryder SUV कारचा वाचा संपूर्ण रिव्ह्यू
- Hydrogen Car : जगप्रसिद्ध कंपनी Ferrari Hydrogen Car लॉन्च करण्याच्या तयारीत, पेट्रोल इंजिनलाही देणार टक्कर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI