Hydrogen Scooter: टीव्हीएस मोटर कंपनी ही नवीन वाहने विकसित करण्याच्या आणि लॉन्च करण्याच्या बाबतीत सर्वात आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक आहे. G 310 प्लॅटफॉर्मसाठी BMW Motorrad सोबत भागीदारी करण्यापासून ते 2022 मध्ये नवीन iQube इलेक्ट्रिक स्कूटर आणि Ronin बाईक लॉन्च करण्यापर्यंत, TVS ने आक्रमक धोरण अवलंबत आहे.


काही रिपोर्ट्स असा दावा करण्यात आला आहे की, TVS हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या स्कूटरवर काम करत आहे. अलीकडेच TVS च्या नवीन स्कूटरच्या पेटंटचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दोन सिलिंडरसारखी गोष्ट दिसत आहे. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे सिलिंडर हायड्रोजनचे असू शकतात. याशिवाय स्कूटरच्या फूट बोर्डमध्ये बॅटरी असल्याचा दावा केला जात आहे.


असे म्हटले जात आहे की, हे इंधन सेल स्कूटरचे मॉड्यूल आहे. ज्यामध्ये हायड्रोजन सिलेंडर आणि बॅटरी देण्यात येणार आहे. फोटोत दिसत असल्याप्रमाणे स्कूटरच्या मागील चाकाला हब इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. जी फ्युएल सेलमधून निर्माण होणाऱ्या विजेद्वारे चालविली जाईल. हायड्रोजन सिलिंडर भरण्यासाठी इंधन कॅप किंवा सिलेंडर काढण्यासाठीही जागा देण्यात आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत TVS मोटरने अशी कोणतीही स्कूटर आणली जाणार असल्याचे अधिकृतपणे उघड केले नाही. परंतु पेटंटच्या फोटोवरून हे स्पष्ट झाले आहे की, कंपनी भविष्यात अशी स्कूटर लॉन्च करू शकते.


सध्या कंपनी iCube इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करत आहे. ही स्कूटर 4.4 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीसह लॉन्च करण्यात आली आहे. जुन्या मॉडेलमध्ये ही स्कूटर फक्त 2.2kWh बॅटरीसह येत होती. मोठ्या बॅटरीमुळे iCube ची रेंजही वाढली आहे. आधी 75 किमीची रेंज देत असताना, आता नवीन iQube 140 किमीची रेंज देते. नवीन TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरसह आता चार्जिंगचे विविध पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. S आणि ST प्रकार 650W आणि 950W च्या पोर्टेबल चार्जरसह येतात. जे अनुक्रमे 4.5 तास आणि 3 तासांमध्ये स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकतात. तर एसटी प्रकारात 1.5kW पोर्टेबल फास्ट चार्जरचा पर्याय देखील उपलब्ध आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI