Honda Dio Sports: दुचाकी निर्माता कंपनी होंडाने आपली नवीन डिओ स्पोर्ट्स स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 68,317 रुपये ठेवली आहे. कंपनीने Dio Sport ला स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांच्या पर्यायामध्ये लॉन्च केले आहे. ज्यामध्ये दोन रंगांचे पर्याय दिले आहेत. Honda Dio Sport एक स्पोर्टी आणि आकर्षक डिझाइनसह येते. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर युनिसेक्स ग्राहकांना आकर्षित करेल.
होंडा डिओ स्पोर्ट्स कंपनीच्या रेड विंग डीलरशिपद्वारे किंवा ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात. या स्कूटरला नवीन डिझाइन केलेले ग्राफिक्स आणि स्पोर्टी रेड रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. ही स्कूटर ब्लॅकसह स्ट्रॉन्टियम सिल्व्हर मेटॅलिक आणि ब्लॅकसह स्पोर्ट्स रेड रंग पर्यायात उपलब्ध आहे. हे रंग पर्याय दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
होंडा डिओ स्पोर्ट्सला अधिक स्पोर्टी लूक देण्यासाठी फायटिंग रेड रिअर कुशन स्प्रिंग देण्यात आले असून त्याच्या डीलक्स व्हेरियंटमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या स्कूटरला फ्रंट पॉकेट आहे, जो स्टोरेजसाठी खूप उपयुक्त आहे. कंपनीने याच्या डीलक्स व्हेरिएंटची किंमत 73,317 रुपये ठेवली आहे.
Honda Dio Sports मध्ये 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.65 bhp पॉवर आणि 9 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये 5.3-लिटरची इंधन टाकी आहे आणि याचे वजन 105 किलो आहे. तसेच याच्या सीटची उंची 650 मिमी असून 160 मिमीच्या ग्राउंड क्लीयरन्ससह ही स्कूटर येते.
दरम्यान, Honda Motorcycle and Scooter India ने जुलै 2022 मधील त्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात 4,43,643 दुचाकींची विक्री नोंदवली असून त्यात 15 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जुलै 2022 मध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात 4,02,701 युनिट्सची विक्री केली. तर इतर देशांना 40,942 युनिट्सची निर्यात केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक
Car loan Information:
Calculate Car Loan EMI