Toyoto Car : तुम्ही जर टोयोटा कार वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. Toyota Kirloskar Motor (TKM) ने भारतात आपली फ्लॅगशिप लक्झरी SUV, Toyota Land Cruiser 300 साठी रिकॉल मोहीम सुरू केली आहे. हे रिकॉल 12 फेब्रुवारी 2021 ते 1 फेब्रुवारी 2023 दरम्यान उत्पादित केलेल्या 269 SUV ला लागू होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रिकॉलचा उद्देश सुरक्षितता उपाय म्हणून ऑटोमॅटिक ट्रांसमिशन ECU सॉफ्टवेअरला पुन्हा प्रोग्राम करणे आहे. प्रस्तावित रीप्रोग्रामिंग कोणत्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आहे हे टोयोटाने निर्दिष्ट केलेले नाही. पण, असे म्हटले आहे की संबंधित समस्येशी कोणतीही घटना आतापर्यंत नोंदवली गेली नाही.


'या' क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधावा 


कंपनी परत मागवलेल्या सर्व SUV चे सॉफ्टवेअर मोफत अपडेट करेल. दरम्यान, ब्रँडने असेही स्पष्ट केले आहे की सॉफ्टवेअर अपडेट होईपर्यंत ग्राहक त्यांची एसयूव्ही वापरणे सुरू ठेवू शकतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी टोयोटा डीलर्स देखील वैयक्तिकरित्या ग्राहकांशी संपर्क साधतील. ज्या ग्राहकांना याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील ते त्यांच्या जवळच्या डीलर किंवा ब्रँडच्या ग्राहक मदत केंद्र क्रमांक 1800-309-0001 वर संपर्क साधू शकतात.


टोयोटा लँड क्रूझरच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात मस्क्युलर हूड, टोयोटा लोगोसह ब्लॅक-आउट ग्रिल, गोल हेडलाईट्स आणि डीआरएलसह एलईडी फॉग लाइट्स आहेत. या कारमध्ये स्क्वेअर विंडो, साइड-स्टेपर्स, ब्लॅक फेंडर आणि 16-इंच चाके आहेत. एसयूव्हीला एसी व्हेंट्स, 2 यूएसबी पोर्ट्स, सेंट्रल कन्सोलवर रेट्रो लँड क्रूझर लोगोसह लाकडी डॅशबोर्ड आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हील भोवती चांदीची रचना देखील मिळते.


'ही' आहेत कारची वैशिष्ट्ये


लँड क्रूझरमध्ये 3.5-लिटर, ट्विन टर्बो V6 डिझेल इंजिन आहे, जे 415ps पॉवर आणि 650Nm टॉर्क जनरेट करते. यासह, यात दुसरे 3.3-लिटर, ट्विन टर्बो V6 डिझेल इंजिन मिळते, जे 309ps पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, दोन्ही इंजिन 10-स्पीड ऑटोमॅटिकसह जोडलेले आहेत. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये टोयोटा लँड क्रूझर 300 लाँच केले. त्याची एक्स-शोरूम किंमत 2.1 कोटी रुपये आहे. ज्या ग्राहकांना याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील ते त्यांच्या जवळच्या डीलर किंवा ब्रँडच्या ग्राहक मदत केंद्र क्रमांक 1800-309-0001 वर संपर्क साधू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


6 Airbags Car : 'या' जबरदस्त SUV 6 एअरबॅगसह येतात, किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी; लिस्ट एकदा पाहाच


Car loan Information:

Calculate Car Loan EMI