New Toyota Glanza: जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने आपल्या Glanza कारचा नवीन व्हेरिएंट भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने ही कार मारुती सुझुकी बलेनो लॉन्च झाल्याच्या काही आठवड्यांनंतर भारतात सादर केली आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वीच याची प्री-बुकिंग देखील सुरू केली होती. ग्राहक कंपनीच्या अधीकृत डीलरशिप किंवा वेबसाइटद्वारे 11 हजार रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. कंपनीने याचे 4 व्हेरियंट लॉन्च केले आहेत. यात E, S, G आणि V यांचा समावेश होतो. या कारमध्ये ग्राहकांना फक्त पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो.
इंजिन आणि पॉवर
नवीन Toyota Glanza मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 90hp पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आले आहे. ही AMT गिअरबॉक्ससह येणारी टोयोटाची भारतातील पहिली कार आहे.
फीचर्स आणि डिझाइन
नवीन ग्लान्झा आणि बलेनोमध्ये बरेच फीचर्स एकसारखे आहेत. यामधील बरेच फीचर्स याच्या जुन्या मॉडेलमध्ये ही देण्यात आले आहेत. कंपनीने आपल्या या नवीन कारमध्ये Camry ग्रिल, एक स्पोर्टियर फ्रंट बंपर, नवीन हेडलाइट्स आणि LED डेटाइम रनिंग लाईट ग्राफिक्स सारखे फीचर्स दिले आहेत. याच्या आतील भागात ही बलेनोशी मिळतेजुळते फीचर्स दिले आहेत. याचे आतील डिझाइन आणि लेआउट देखील अगदी बलेनो सारखेच आहे. यात एक लेयर्ड डॅशबोर्ड, फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीयरिंग व्हील डिझाइन ही मिळते. याच्या इंटिरियरमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे संपूर्ण कॅबिनमध्ये ब्लॅक आणि बेन्झ रंग पाहायला मिळतो.
यात हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-डिग्री कॅमेरा, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सपोर्टसह 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 'टोयोटा आय-कनेक्ट', ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टिल्ट, टेलिस्कोपिक ऍडजस्टमेंटसह स्टीयरिंग आणि 6 एअरबॅग सारखे फीचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत. कंपनी यासोबतच 3 वर्षे किंवा 1 लाख किमीची वॉरंटी देत आहे. तसेच याची वॉरंटी 5 वर्षे किंवा 2.20 लाख किमीपर्यंत वाढवता येते.
नवीन Glanza चे बेस व्हेरिएंट जुन्या बेस व्हेरियंटपेक्षा फक्त 4,000 रुपयांनी महाग आहे. तसेच याचा टॉप व्हेरिएंट जुन्या मॉडेलपेक्षा फक्त 20,000 रुपये जास्त महाग आहे. Glanza प्रीमियम श्रेणीत लॉन्च होणारी नवीन हॅचबॅक आहे. भारतात याची स्पर्धा मारुतीच्या बलेनो, टाटा मोटर्स अल्ट्रोझ आणि ह्युंदाईच्या i20 शी होणार आहे.
व्हेरिएंट आणि किंमत
Variants |
MT |
AMT |
Toyota Glanza E |
Rs. 6,39,000 |
- |
Toyota Glanza S |
Rs. 7,29,000 |
Rs. 7,79,000 |
Toyota Glanza G |
Rs. 8,24,000 |
Rs. 8,74,000 |
Toyota Glanza V |
Rs. 9,19,000 |
Rs. 9,69,000 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
Maruti Suzuki Car Discount: मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळत आहे जबरदस्त सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
-
इस तारीख को लॉन्च होगी Royal Enfield की नई बाइक, करीब 1.90 लाख रुपये हो सकती है कीमत
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero
Car loan Information:
Calculate Car Loan EMI