दक्षिण कोरियन कंपनी Kia ने आपली नवीन Carens कार लॉन्च केली आहे. ही कार म्हणजे SUV आणि MPV चं कॉम्बिनेशन आहे. कियाच्या नवीन कारला 'आरव्ही' देखील म्हणतात. या कारची किंमत पाहता भारतात याची स्पर्धा Maruti XL6 शी होणार आहे. XL6 हा Ertiga चा प्रीमियम प्रकार आहे. या बातमीत आपण या दोन्ही कराची तुला करून कोणती कार बेस्ट आहे, हे जाणून घेणार आहोत. 


कोणाचा लूक आहे भारी 


Carens कार ही आकाराने मोठी असून XL6 कराची रुंदी अधिक आहे. या दोघांची डिझाइनही खूप वेगेळी आहे. ज्यात कियात वेगेळे हेडलॅम्प / डीआरएल आणि ग्रील दिसते. जवळून पाहिल्यास याच्या ग्रीलची डिझाइन लक्ष वेधून घेते. 4540 मिमी, कॅरेन्स ही या किंमतीत उंचीने सर्वात मोठी कार असून दिसायला याचा लूक चांगला आहे. तर XL6 ही आकाराने लहान असली तरी Ertiga चा लूक दिसायला चांगला आहे. Ertiga ने फ्रंट-एंड बदलले असून यात क्लॅडिंग देखील आहे. केरेन्समध्ये 16-इंच अलॉय व्हील मिळतात, तर XL6 स्पोर्ट्स 15-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. कॅरेन्सचा ग्राउंड क्लीयरन्स 195mm आहे. जो XL6 च्या 180mm पेक्षा जास्त आहे.



कोणाचे इंटिरियर आहे जबरदस्त 


अशा प्रकारच्या कारमध्ये प्रीमियम इंटिरियर पाहायला मिळते. अशा गाड्या जास्त करून लांबच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. यासोबतच याच्या दुसऱ्या रांगेतील इंटिरियर दिसायला अधिक चांगले आणि आरामदायक असते. कॅरेन्समध्ये अपहोल्स्ट्रीमचा पर्याय वेगळा आहे. यात बाहेरील लोखंडी ग्रील प्रमाणेच ग्लॉस ब्लॅक पॅनेल पाहायला मिळते. याच्या डिझाइनसाठी वापरण्यात आलेले  मटेरिअल्स खूप दर्जेदार आहे. XL6 देखील खूप प्रिमियम. यात ऑल ब्लॅक लूक देण्यात आला आहे. यात ग्राहकांना फॉक्स वुड फिनिश मिळते. मात्र या दोघांच्या तुलनेत Carens दिसायला थोडी आलिशान वाटते.



फीचर्स 


Carens मध्ये एक मोठी टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. AC साठी टच कंट्रोल्स, एअर फ्रंट सीट्स, 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग, बोस ऑडिओ सिस्टम, सनरूफ, एअर प्युरिफायर, रियर व्ह्यू कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच याच्या दुसऱ्या रांगेतील सीट इलेक्ट्रिकली फोल्ड केलेल्या आहेत. कॅरेन्समध्ये 6 एअरबॅग देणार आले आहे. तसेच समोर आणि मागील बाजूस पार्किंग सेन्सर्स आणि कनेक्टेड तंत्रज्ञानाव्यतिरिक्त आणखी काही फीचर्स देण्यात आले आहे. केर्न्समध्ये तिसर्‍या लाईनमध्ये चार्जिंग सुविधा आणि एसी व्हेंट्स देखील देण्यात आले आहे. XL6 मध्ये इतके फीचर्स नाहीत. परंतु यात टचस्क्रीन, ऑप्शन कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, पर्सनल कॅप्टन सीट आणि बरेच वेगेळे फीचर्स देण्यात आले आहे.



कोणती कार अधिक आरामदायक? 


Carnens आणि XL6 या तिसर्‍या रांगेतही पुरेशी जागा असलेल्या मोठ्या सात सीटर कार आहेत. Carnens चा फायदा असा आहे की, दुसऱ्या रांगेत इलेक्ट्रॉनिक वन टच टम्बल फिचर आहे. ज्यामुळे मागील सीटवर प्रवेश करणे सोपे होते. Carnens च्या तिसर्‍या रांगेत चांगला लेगरूम मिळतो. जेणेकरून उंच लोकांनाही बसण्यात अडचण येत नाही. XL6 च्या तिसर्‍या रांगेत प्रवेश करणे थोडे कठीण जाते. मात्र येथील सीट्स देखील आरामदायक आहे. तुम्ही या दोन्ही कार थ्री रो कार म्हणून वापरू शकता. Carnens च्या सीट्स या अधिक Adjustable आहेत. या उलट XL6 च्या सीट्स जास्त Adjustable नसल्या तरी यात पुरेशी जागा देण्यात आली आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI