Top 3 SUVs of India : गेल्या काही वर्षांत देशात एसयूव्ही (SUV) कारच्या मागणीत बरीच वाढ झाली आहे. या सेगमेंटमध्ये मारुती (Maruti), टोयोटा (Toyota) आणि टाटा (TATA) कार खूप लोकप्रिय आहेत. यामागचं कारण म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंतच्या सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी अशाच काही कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जाणून घेऊयात या गाड्यांची संपूर्ण यादी...

  


टाटा पंच (Tata Punch) :


टाटाची ही कार देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. ही कार प्युअर, अॅडव्हेंचर, अॅक्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह अशा चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. या कारला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 86PS आणि 113Nm चे आउटपुट जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 5-स्पीड AMT ट्रान्समिशन पर्यायाशी जोडलेले आहे. या कारमध्ये 366 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनिंग, सात-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 9.54 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.  


मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Breza) :


मारूतीने गेल्या वर्षी ही कार अपडेट केली होती. तेव्हापासूनच या कारची मागणी खूप वाढली आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या व्हेरिएंटमध्ये येते. याला 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS/137 Nm आउटपुट जनरेट करते. या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही आहे. तसेच, 328 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. या कारच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, चार स्पीकर, सिंगल-पेन सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, 360-डिग्री कॅमेरा आणि पॅडल शिफ्टर्स मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख ते 14.04 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 


टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) :


ही कार 4x2 MT, 4x2 AT, 4x4 MT, 4x4 AT आणि Legender 4x2 AT अशा 5 व्हेरिएंटमध्ये येते. SUV ला 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.8-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. ज्यामध्ये पेट्रोल इंजिन 164bhp पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करते. या कारची लांबी 4,795 मिमी, रुंदी 1,855 मिमी आणि उंची 1,835 मिमी आहे. या कारमध्ये कूल्ड ग्लोव्ह-बॉक्स, ड्राईव्ह मोड्स, आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 37.82 लाख ते 58.18 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


7-सीटर कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, मारुती सुझुकी घेऊन येत आहे या दोन मस्त कार! ADAS फीचरने असेल सुसज्ज


Car loan Information:

Calculate Car Loan EMI