February Car Sales report: घरगुती ऑटोमोबाईल बाजार पुन्हा वेगाने पुढे वाढत आहे. वाहन विक्रीमध्ये यावेळी ग्राहकांमध्ये एसयूव्ही कारची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. असं असलं तरी विक्रीच्या बाबतीत हॅच बॅक कार पुढे आहेत. मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 (February Car Sales report) मध्ये देशात 1,51,448 कार विकल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये मारुती सुझुकी ही सर्वाधिक कार विक्रीसह मार्केट किंग ठरली आहे. मारुती सुझुकी व्यतिरिक्त कोणत्या आहे अशा कार्स आहे ज्याची सर्वाधिक विक्री झाली आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ...



February Car Sales report: फेब्रुवारी 2024 मध्ये दहा सर्वाधिक विक्री झालेल्या कार



  • फेब्रुवारीमध्ये विकल्या गेलेल्या वाहनांमध्ये मारुती बालेनो पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनी आपल्या कारच्या 18,592 युनिट्सची विक्री करण्यात यशस्वी झाली. गेल्या वर्षी या कारच्या 12,570 युनिट्स विकल्या गेल्या.

  • मारुती स्विफ्ट ही दुसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक विक्री करणारी कार होती. या कारची 18,422 युनिट विकली (February Car Sales report) गेली.

  • मारुती सुझुकी अल्टो ही तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक विक्री करणारी कार होती. या कारच्या 18,114 युनिट्सची विक्री करण्यात कंपनी यशस्वी झाली. नुकत्याच लॉन्च झालेल्या अल्टो फेसलिफ्टलाही चांगली पसंती मिळाली आहे.

  • चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती वॅगन-आर आहे. फेब्रुवारी 2024 कंपनी आपल्या 16,889 युनिट्सची विक्री करण्यात यशस्वी झाली.

  • मारुतीची सेडान कार मारुती स्विफ्ट डीझायर पाचव्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनी या कारच्या 16,798 युनिट्सची विक्री करण्यात यशस्वी झाली.

  • गेल्या महिन्यात सर्वोत्कृष्ट -विकणारी कार सहाव्या क्रमांकावर मारुतीची ब्रेझा आहे. कंपनीने या कारच्या 15,787 युनिट्सची विक्री (February Car Sales report) केली.

  • फेब्रुवारी महिन्यात टाटा नेक्सन एसयूव्ही कार बेस्ट -सेलिंग कारमध्ये सातव्या क्रमांकावर होती. कंपनी आपल्या 13,914 युनिट्सची विक्री (February Car Sales report) करण्यात यशस्वी झाली.

  • मारुती सुझुकीची एमपीव्ही कार आठव्या क्रमांकावर राहिली असून कंपनीने आपल्या  11,352 युनिट्स विकल्या आहेत.

  • फेब्रुवारीमध्ये आणखी एका टाटा कारने सर्वोत्कृष्ट -विक्री करणार्‍या कारमध्ये प्रवेश केला आहे. टाटा पंच 11,169 युनिट्सच्या विक्रीसह नवव्या क्रमांकावर आहे.

  • यासोबतच ह्युंदाईची सर्वाधिक मागणी असलेली कार ह्युंदाई क्रेटा होती. कंपनी आपल्या कारच्या 10,421 युनिट्सची विक्री करण्यात यशस्वी झाली.


इतर बातमी: 


Womens day Vandana Khemse : दुबईतील बॉडीगार्डची नोकरी सोडली अन् मुलींच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला भारतात परतल्या; तळेगावच्या वंदना केमसेंची धाडसी कहाणी


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI