Fastest Electric Car : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola ने आज भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारची पहिली झलक आज दाखविण्यात आली. विशेष म्हणजे ओलाची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीचा असा दावा आहे की, ही कार 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 4 सेकंदात गाठणार आहे. या कारमध्ये कोणते फिचर्स खास असणार आहेत ते जाणून घ्या. 


1. ओलाने असा दावा केला आहे की, ही कार एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त धावेल. याचा अर्थ असा आहे की, भारतात आत्तापर्यंतच्या सर्व कारपेक्षा अधिक श्रेणी असणार आहे.


2. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे, ओलाने सांगितले की, ही कार स्पोर्टी लूकमध्ये असेल आणि या कारच्या छप्परचा भाग पूर्णपणे काचेचा असेल. ही कार पहिल्या नजरेत सेडानसारखी दिसते पण फोटोत ती खूपच सुंदर दिसते. 


3. कारचा विचार केला तर, स्पीडची सर्वाधिक चर्चा होते आहे. ही फक्त चार सेकंदात ही कार 100 किमीचा वेग पकडणार असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दावा केला आहे की, ही कार जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असेल.


4. अनेक कार चावी शिवाय चालणाऱ्या आहेत. यामध्ये काही नवीन नाही. परंतु, ओला कंपनीने असा दावा केला आहे की, हॅंडललेसही असेल. या संदर्भात अधिक माहिती अजून आलेली नाही. 


5. यासोबतच या कारमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. ही कार व्हॉईस कमांड, नेव्हिगेशन, कॅमेरे आदींनी परिपूर्ण असेल. म्हणूनच ओला कारच्या सीईओने तिला भारताची कार म्हणून संबोधले आहे.


6. त्याचबरोबर कंपनीच्या सीईओ चे म्हणणे आहे की, जगातील 50 टक्के इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय हा भारतातून बनवायचा आहे. असे त्यांचे स्वप्न आहे.    


7. ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले की, जगातील 40 टक्के प्रदूषण केवळ ऑटोमोबाईलमधून होते. प्रदूषण कमी करण्यावर भर देत ते म्हणाले की, यासाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल (Electrical Vehicle) विभागात काम करण्याची गरज आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI