Independence Day 2022: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी बहुप्रतिक्षित ओलाची इलेक्ट्रिक कार कंपनी लॉन्च करणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल हे एका महिन्याहून अधिक काळ याची जाहिरात करत होते. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "पिक्चर अजून बाकी आहे, भेटू 15 ऑगस्टला दुपारी 2 वाजता."


500 किमीची मिळेल रेंज 


आधीच टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी ओला आता चारचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहे. ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण होण्यापूर्वीच ही कार 500 किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. ही कार सध्या देशात उपलब्ध असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक कारपेक्षा अधिक रेंज देऊ शकणार आहे. सध्या देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV Max देखील यापेक्षा कमी रेंज देईल, असं बोललं जात आहे. यातच महिंद्राही लवकरच आपली इलेक्ट्रिक SUV XUV 400 सादर करणार आहे.






कशी असेल डिझाइन? 


डिझाइनच्या बाबतीत सध्या जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु ही इलेक्ट्रिक कार Kia EV6 सारखी असू शकते. कारला समोरील बाजूस सिग्नेचर LED लाइटिंग आणि किआसारखी मागील डिझाइन असेल. या कारमध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्स देऊ शकते. तसेच इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा ओलाची इलेक्ट्रिक कार खूप वेगळी असेल. या कारची किंमत किती असेल? याबाबतही अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र भाविश अग्रवाल यांनी केलेल्या ट्वीटनुसार उद्या कार लॉन्च झाल्यावर याची बरीच माहिती समोर येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक या कारच्या प्रतीक्षेत आहे. अशातच उद्या इलेक्ट्रिक कार चाहत्यांची ही प्रतीक्षा संपेल का? हे उद्या दोन वाजता कळणार आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI