Maruti Jimny 5-door vs Mahindra Thar 5-door: भारतात एसयूव्ही कारची मागणी वाढली आहे. एसयूव्ही कारची वाढती मागणी आणि लोकप्रियता पाहता अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या नवीन वाहन बाजारात लॉन्च करणार आहेत. यातच आपल्याला लवकरच 5-डोर ऑफ-रोडर SUV ची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्रा आणि मारुती या दोन्ही कंपन्या आपली कार सादर करणार आहेत. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती पहिल्यांदाच आपली नवीन दमदार एसयूव्ही Jimny सादर करणार आहे. तर यातच महिंद्राही आपली 5-डोअर एसयूव्ही Thar सादर करणार आहे. या दोन्ही कार एकाचवेळी बाजारात दाखल होऊ शकतात. भारतात आधीपासूनच 3 डोअर थरांची विक्री होत आहे. मात्र 3 डोअर जिम्नीची भारतात विक्री होणार नाही. कारण कंपनी याचे अपडेटेड 5 डोअर व्हर्जन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. 


कशी असेल मारुती जिम्नी? 


नवबीन मारुती जिम्नीमध्ये कंपनी 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देणार असून हे इंजिन मारुतीच्या XL6, ब्रेझा आणि नवीन ग्रँड विटारामध्ये देखील वापरले जात आहे. जिम्नीला जिमनीला 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. जिम्नीचे जुने ग्लोबल व्हेरियंट 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असल्याने हे एक मोठे अपडेट आहे. इंडिया-स्पेक 5-डोअर जिमनीला 9-इंच टचस्क्रीन देखील मिळेल. ज्यात कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह नवीनतम फीचर्सचा समावेश असेल. ही एक प्रीमियम SUV असेल. 


5 डोअर थार


नवीन 5 डोअर थारमध्ये बॉडी पॅनेल्ससह 3 डोअर थारच्या तुलनेत बरेच बदल दिसतील. मात्र याची समोरची डिझाइन जुन्या थारसारखीच असेल. नवीन थारमध्ये जुन्या मॉडेलसारखेच डिझेल आणि पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. यात 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेलचा पर्याय आहे. दरम्यान, या दोन्ही कारमध्ये ग्राहकांना अधिक जागा आणि बूट स्पेस मिळणार आहे.


4x4 फीचर


या दोन्ही कार 4x4 फीचरसह बाजारात उतरवल्या जाणार आहेत. या फीचरसह येणार मारुतीची ही पहिली कार असले. तर नवीन ग्रँड विटारा AWD प्रणालीसह येईल. त्यामुळे तुम्ही ऑफ-रोड क्षमतेसह 5-डोअर असलेली SUV शोधत असाल, तर तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI