Upcoming Cars in January 2024 :  नवीन वर्षाच्या सुरुवातीला मारुती सुझुकी (Maruti Suzuki)  , ह्युंडाई, किआ आणि महिंद्रा आपल्या नव्या कार बाजारात आणणार आहेत. ह्युंडाई मोटर इंडियाने 16 जानेवारी 2024 रोजी क्रेटा फेसलिफ्टची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय किआ 14 डिसेंबर 2023 रोजी आपला फेसलिफ्ट सोनेट लॉंच करणार आहे. मारुती सुझुकीने नव्या जनरेशनच्या स्विफ्टच्या लाँचिंगच्या तारखांची अधिकृत घोषणा केली नसली तरी ती जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा देखील आपल्या एक्सयूव्ही 300 सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि XUV400  इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अपडेटेड मॉडेल लाँच करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या नव्या अपडेट ेड मॉडेल्समध्ये काय मिळणार आहे. 


ह्युंडाई क्रेटा फेसलिफ्ट (Hyundai Creta Facelift)


ह्युंडाई मोटर इंडिया 16 जानेवारी रोजी नवीन क्रेटा फेसलिफ्ट लॉंच करणार आहे. या एसयूव्हीची डिझाइन ह्युंडाईच्या ग्लोबल मॉडेल पॅलिसेडसारखं असेल. फ्रंटमध्ये प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED डीआरएलसह नवीन मोठी ग्रिल असेल. इंटिरिअर अपग्रेडमध्ये ADAS (अॅडव्हान्सड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम), नवीन पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 360 डिग्री कॅमेरा मिळेल. नवीन क्रेटामध्ये सध्याच्या 115 बीएचपी, 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनव्यतिरिक्त वेर्नामधील 160 बीएचपी, 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल.


किआ सोनेट फेसलिफ्ट (Kia Sonet facelift)


किआ 14 डिसेंबर 2023 ला  सोनेट लाँच करणार आहे. ज्याची किंमत जानेवारी 2024 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. फेसलिफ्ट सोनेटमध्ये नवीन सेल्टोससारखा एलईडी लाइट बार, सी-आकाराचे टेललॅम्प आणि रियर स्पॉयलरसह आत आणि बाहेर अनेक बदल दिसतील. इंटिरियरमध्ये सेल्टोससारखे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एडीएएस तंत्रज्ञान असेल. सध्याच्या 1.2 लीटर पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 L डिझेल इंजिनसह उपलब्ध असेल. 


नवी मारुती स्विफ्ट (New Generation Maruti Swift)


मारुती सुझुकी आपली नवीन जनरेशनची स्विफ्ट जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच करू शकते. इंटिरिअर डिझाइनच्या फ्रॉन्क्स आणि बलेनोसारखं भारत-स्पेक व्हर्जनमध्ये एडीएएस तंत्रज्ञानाचा समावेश असणार नाही आहे. 2024 स्विफ्टमध्ये नवीन 1.2 एल, 3-सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे सध्याच्या K-सीरिज 1.2 L, 4-सिलिंडर इंजिनपेक्षा जास्त मायलेज देईल.


महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट (Mahindra XUV300 facelift)



महिंद्रा अँड महिंद्रा जानेवारी 2024 मध्ये एक्सयूव्ही 300 सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एक्सयूव्ही 400 इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन XUV 300 फेसलिफ्टमध्ये 131 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय सध्याच्या 110 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 117 बीएचपी, 1.5 लीटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध असेल. XUV 300 फेसलिफ्टमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात येणार असून या फीचरसह येणारी ही फेसलिस्ट सेगमेंटमधील पहिली कार ठरली आहे. तसेच यात आणखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाची बातमी-


Smart Driving Tips : धुक्यात गाडी चालवताना 'या' ट्रिक्स फॉलो करा नाहीतर धुक्याची चादर जीवघेणी ठरू शकते!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI