Royal Enfield Super Meteor 650: दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकची विक्रीही भारतात मोठ्या प्रमाणात होते. अशातच कंपनीने आपल्या नवीन Royal Enfield Super Meteor 650 चा टीझर रिलीज केला आहे. कंपनी आपल्या नवीन बाईकचे अनावर 8 नोव्हेंबर रोजी मिलान (इटली) येथे होणाऱ्या EICMA 2022 मोटर शोमध्ये करणार आहे. कंपनी आपल्या या नवीन बाईकचे नाव अद्याप जाहीर केलं नाही. मात्र याचे नाव 'Super Meteor 650' असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याची डिझाइन सध्याच्या Meteor 350 सारखी असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च केल्यानंतर ही बाईक भारतात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी 2023 च्या सुरुवातीस याची देशात विक्री सुरु करू शकते.
नवीन Super Meteor 650 त्याच 650cc प्लॅटफॉर्मवर आधारित असेल जी कंपनी सध्या इंटरसेप्टर INT 650 आणि Continental GT 650 सारख्या मॉडेल्समध्ये वापरण्यात आले आहे. याचे इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये जास्त बदल किंवा कोणतेही मोठे अपडेट होण्याची शक्यता कमी आहे. Super Meteor 650 ही एक क्रूझर बाईक आहे. यात 648 cc, इन-लाइन ट्विन-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते. जे 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये गिअरबॉक्स 6-स्पीड युनिट आहे. तसेच स्लिप आणि असिस्ट क्लच उपलब्ध असेल.
बाईकवरील चेसिस नवीन आवश्यकतांनुसार अपडेट केले जाण्याची शक्यता आहे. Super Meteor 650 मध्ये LED लाइट्स, सेमी-डिजिटल मीटर क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिस्क ब्रेक्स, स्लिप आणि असिस्ट क्लच, ड्युअल-चॅनल ABS आणि ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम यासारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. टीझरमध्ये बाईकचा फक्त मागील भाग दिसत आहे. यात Meteor 350 प्रमाणे LED टेल लॅम्प युनिट मिळते. यात ट्विन एक्झॉस्ट आणि स्प्लिट सीट आहेत. याच्या पुढे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. जो Meteor 350 आणि Scrum 411 मध्ये देखील आढळतो. टीझरमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम देखील दिसत आहे. दरम्यान, Royal Enfield Super Meteor 650 2022 बाईक भारतात याच महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. याबाईक बद्दल अद्याप तपशीलवार माहिती उपलब्ध झालेली नाही.
इतर महत्वाची बातमी:
Maruti Suzuki Cars: मारुतीने 40 वर्षात केलं 2.5 कोटी कारचे उत्पादन, जाणून घ्या कंपनीच्या यशाचे रहस्य
Car loan Information:
Calculate Car Loan EMI