Upcoming Xpulse 200T 4V: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp भारतात लवकरच आपली नवीन XPulse 200T 4V लॉन्च करू शकते. कंपनीने आपल्या नवीन बाईकचा टिझर जारी केला आहे. त्यात ही बाईक दिसत आहे. ही बाईक अपग्रेड केलेल्या इंजिनसह आणि नवीन रंग पर्यायसह येण्याची अपेक्षा आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 


कंपनीची ही नवीन Hero XPulse 200T 4V नुकतीच देशात टीव्हीसी शूट दरम्यान दिसली आहे. या बाईकच्या लीक झालेल्या फोटोंमध्ये असे दिसून येते की, या बाईकमध्ये फोर्क कव्हर गेटर्स, हेडलॅम्पवर नवीन व्हिझर, नवीन पेंट स्कीम आणि बरेच काही मिळू शकते. या टूरिंग बाईकसाठी सर्वात मोठे अपडेट त्याचे इंजिन असेल, असे बोलले जात आहे. 


हिरोच्या नवीन XPulse 200T 4V मध्ये 199.6 cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह इंजिन दिले जाऊ शकते. ही बाईक 18.9 Bhp आणि 17.35 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असले. जी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. या बाईकमध्ये ग्राहकांना  XPulse 200T 4V ला ब्लूटूथ-आधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. असे असलं तरी या बाईकच्याच्या हार्डवेअर बिट्समध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. यामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेन्शन दिले जाऊ शकतात. ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस दिले जाऊ शकते. या नवीन बाईकची किंमत कंपनी 1.24 लाख रुपये ठेवू शकते, अशी शक्यता आहे. ही बाईक खूपच प्रीमियम असू शकते.


कंपनीने ही बाईक भारतात लॉन्च केल्यानंतर याची स्पर्धा  Xpulse 200T 4V बाईक होंडा हॉर्नचा Honda Hornet 2.0, Bajaj Pulsar NS200 आणि TVS Apache ATR 200 4V शी होईल. दरम्यान, Hero ने ऑक्टोबर महिन्यात 4.54 लाख दुचाकींची विक्री केली असून 32 दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत 20% ची वाढ नोंदवली आहे. कंपनीने मागील वर्षी विकलेल्या 505,957 युनिटच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 419,568 बाईकची विक्री केली आहे. तर ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनी 35,014 स्कूटरची विक्री केली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात 42,013 स्कूटर इतकी होती. 


 


इतर महत्वाची बातमी: 


 


Maruti Suzuki Cars: मारुतीने 40 वर्षात केलं 2.5 कोटी कारचे उत्पादन, जाणून घ्या कंपनीच्या यशाचे रहस्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI