Praviag Defy Electric SUV: भारतात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमध्ये अनेक नवीन कंपन्यांनी पदार्पण केलं आहे. यामध्येच बेंगळुरू येथील स्टार्ट-अप कंपनी Pravaig डायनॅमिक्स भारतीय बाजारपेठेसाठी डेफी नावाची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार करत आहे. Pravaig ने यापूर्वी इलेक्ट्रिक सेडानचे प्रदर्शन केले होते. कंपनीची Defy ही एक रेडीमेड लक्झरी SUV आहे, जी या नोव्हेंबरच्या 25 तारखेला लॉन्च होणार आहे. Defy ही एक मोठी SUV आहे आणि लक्झरी SUV सारखीच फीचर्ससह फ्लॅगशिप SUV ची सर्व फीचर्स कमी किमतीत ग्राहकांना ऑफर करते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डायरेक्ट टू कंझ्युमर रिटेल मॉडेलद्वारे विकली जाईल. 


Defy मोठ्या बॅटरी पॅकसह आणि ऑल व्हील ड्राइव्हसह ड्युअल-मोटर लेआउटसह येईल. ही एसयूव्ही रुंद आणि मस्क्यूलर डिझाइनसह जबरदस्त लुकसह येईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मोठी टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले आणि डिव्हिएट साउंड सिस्टीमसह ऑटोनॉमस सहित अनेक फीचर्स यात पाहायला मिळतील. डेव्हिएलेट ही एक फ्रेंच कंपनी आहे जी प्रीमियम ऑडिओ सिस्टम बनवते.


फीचर्स 


आधुनिक काळातील इलेक्ट्रिक SUV प्रमाणे या कारच्या सॉफ्टवेअर आधारित फीचर्स, OTA अपडेट आणि कॉस्टमायजेशन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या यासोबतच ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यात 5G वरून 6G वर सहज अपग्रेड करण्याची क्षमता देखील यात दिली जाऊ शकते. पर्यायी लक्झरी फीचर्स म्हणून यात फोल्ड-आउट टेबल्स मिळतील, तसेच Defy ला कॅप्टन सीट लेआउट देखील मिळेल.


रेंज 


या कारच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही SUV रिअल टाइममध्ये 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. तर पॉवरच्या बाबतीत ही कार 400 bhp ची पॉवर जनरेट करू शकते आणि याची टॉप स्पीड 200 kmph आहे. इलेक्ट्रिक SUV मध्ये 400V आर्किटेक्चर आहे, जे V2L आणि इतर विविध फीचर्सला सपोर्ट करते. चार्जिंग वेळेच्या बाबतीत, Defy मध्ये फास्ट-चार्जिंग तंत्रज्ञान आहे. म्हणजे याची बॅटरी फक्त 30 मिनिटांत रिचार्ज होते. दरम्यान, भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आधीपासूनच बाजारात आपलं वर्चस्व असलेल्या वाहन उत्पादक कंपन्या बाजारात उतरवत आहे. अशातच या नवीन कंपनीच्या एसयूव्हीला बाजारात कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहावं लागेल. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Maruti Suzuki Cars: मारुतीने 40 वर्षात केलं 2.5 कोटी कारचे उत्पादन, जाणून घ्या कंपनीच्या यशाचे रहस्य


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI